कर्जतः महाडमध्ये आपली ताकद वाढवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी आता कर्जत विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांचा आणि कर्जत-खालापूरमधील पदाधिकार्यांचे राजीनामे नामंजूर करीत त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला नवी ऊर्जा मिळणार असून, आगामी राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तर सुधाकर घारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय होताना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मोठा पक्षप्रवेश होण्याची चर्चा रंगली आहे. 22 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा तिकीट नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती; मात्र आता पक्षाने त्यांचा राजीनामा नामंजूर केला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी अधिकृत पत्राद्वारे त्यांना पक्षात पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. घारे यांचा राजीनामा नामंजूर झाल्याने, ते लवकरच राष्ट्रवादीत सक्रिय होणार असून, कर्जतमध्ये पक्ष अधिक मजबूत होईल, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. या निर्णयामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण घारेसमर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता आहे.
महाडमध्ये स्नेहल जगताप यांच्या प्रवेशाच्या निश्चितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे, असे असताना कर्जतमधील पक्षातील असंतुष्ट गट पुन्हा संघटित करण्यावर सुनील तटकरे भर देत आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस कर्जतमध्ये नवे समीकरण तयार करीत आहे. सुधाकर घारे यांच्या पुनरागमनानंतर, इतर पक्षातील मोठी नावे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कर्जतमधील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. एकूणच तटकरेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जतमध्ये पुन्हा जोर धरला आहे. आगामी काळात पक्ष आणखी कोणत्या मोठ्या नेत्यांना आपल्या गोटात खेचतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.