loader
Breaking News
Breaking News
Foto

उक्षी येथील प्रतिष्ठित खोत पद्माकर देसाई यांचे निधन

रत्नागिरी (वार्ताहर) :- तालुक्यातील उक्षी गावचे खोत पद्माकर देसाई यांचे नुकतेच वयाच्या ८२ व्या वर्षी दुखःद निधन झाले. कै.पद्माकर देसाई हे प्रत्येकाला आपल्या वडिलांसमान होते. प्रत्येकाचा आधार स्तंभ होते. पद्माकर देसाई यांनी आपल्या जीवनकाळात अनेक विविध पदे भूषविली. प्रत्येक पदाला त्यांनी योग्य असा न्याय दिला. कधी सरपंच, कधी तंटामुक्त अध्यक्ष, तर कधी एखाद्या समितीचे सदस्य, अशा विविध पदांवरची कारकिर्द उल्लेखनीय राहिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पद्माकर देसाई यांचे निधन २१ मार्च रोजी अल्पशा आजाराने झाले. त्यांच्या जाण्याने गावातील प्रत्येक जण हळहळला. पद्माकर देसाई यांच्या माध्यमातून आज अनेक जणांची कुटुंबे सावरली आहेत. त्यांनी अनेकांना परोपकारी वृत्तीने मदतीचा हात पुढे केला. कोणताही बडेजावपणा न करता प्रत्येक माणूस आपल्या कुटुंबातील सदस्य आहे असेच मानून त्यांनी अनेकांना वेळोवेळी मदत केली. कै.पद्माकर देसाई यांची दशक्रिया विधी ३० मार्च रोजी त्यांच्या राहत्या घरी उक्षी देसाईवाडी येथे होणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg