loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई शहराला मिळणार देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ! ‘या’ शहरांमधून धावणार

वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली सेमीहायस्पीड ट्रेन असून ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली. ही गाडी पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली आणि आता ही ट्रेन सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू आहे. वंदे भारत ट्रेन्सनंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन सुद्धा सुरू होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच रुळावर दिसणार आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे देशातील पहिले वंदे भारत स्लीपर ट्रेन आपल्या महाराष्ट्रातून धावणार आहे. मुंबई शहराला देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मान मिळणार असल्याची बातमी हाती येत आहे. दरम्यान आज आपण मुंबईहून कोणत्या शहरासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु होणार याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळुरू ते मुंबई या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस सुरू करण्याची शक्यता आहे.

टाइम्स स्पेशल

या मार्गावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि यामुळे वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर मंगळुरू ते मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू व्हावी यासाठी उडुपी-चिकमंगळूरचे खासदार कोटा श्रीनिवास पूजारी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवले आहे. या मार्गावर रेल्वेसेवा वर्षभर तुडुंब भरलेल्या असतात, त्यामुळे प्रवाशांना वेगवान आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय मिळावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. खासदार पूजारी यांनी आपल्या पत्रात मंगळुरू-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस गाडी कमी प्रवासीसंख्येमुळे बंद होण्याच्या शक्यतेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg