कोकणातील शिमगोत्सव हा संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. वर्षभर ओसाड पडलेली गावे शिमगोत्सवाच्या निमित्ताने गजबजलेली पाहायला मिळतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील पळचील ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणार्या खडकवणे या गावी शिमगोत्सव अतिउत्साहाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध शैक्षणिक, क्रिडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन खडकवणे ग्रामस्थ मंडळ, मुंबई-पुणे यांच्या मार्फत राबविण्यात आले. डिजिटल शिक्षणाची गरज लक्षात घेऊन पळचील ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणार्या स्व.शांताराम शंकर जाधव न्यू इंग्लिश स्कूल पळचील या शाळेला खडकवणे मुंबई ग्रामस्थ मंडळामार्फत २ संगणक मॉनिटर आणि १ कलर प्रिंटर भेट देण्यात आले.
यावेळी महादेव निविलकर (माजी सभापती), आनंद निविलकर (पोलिस पाटिल), नारायण साळवी (ग्रामपंचायत सदस्य), खडकवणे मुंबई ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दत्ताराम वरवाटकर, अरुण वरवाटकर, गोविंद वरवाटकर, नरेश वरवाटकर, बाळकृष्ण देवळकर, विठ्ठल टेरवकर, निलेश अजगणकर, दिपक कलमकर, दिगंबर निविलकर, शाळा समिती अध्यक्ष उमेश मोरे, उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, केंद्रप्रमुख सुदाम राणे, मुख्याध्यापक संजय जैतपाळ आणि इतर ग्रामस्थ सदस्य असे मान्यवर उपस्थित होते. युवापिढीला एकजूट संघटित करण्यासाठी खडकवणे गाव अंतर्गत भव्य दिव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन अमित मांडके, शुभम निविलकर, अभिजीत निविलकर आणि खडकवणे ग्रामस्थ मंडळ, मुंबई-पुणे यांच्यावतीने करण्यात आले. श्री भैरवनाथ प्रसन्न हा संघ अंतिम सामन्यात विजयी झाला.
खडकवणे गावामध्ये अतिशय आनंदाने, उत्साहाने, ढोल ताशांच्या गजरात, लेझिमच्या चालीवर, फटाक्यांच्या आतिषबाजीत खडकवणेकरांनी त्यांच्या लाडक्या श्री भैरवनाथाचे स्वागत केले. श्री भैरवनाथाच्या आगमना प्रित्यर्थ वरवाटकर भावकीने सानेवर सत्यनारायणाची महापूजा आणि महाप्रसाद या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नंतर खडकवणे ग्रामस्थ मंडळ, मुंबई-पुणे यांचे सामुदायिक भजन झाले. महिला सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या मनोरंजनासाठी खडकवणे मुंबई-पुणे मंडळामार्फत खेळ पैठणीचा हा कार्यक्रम महिलांसाठी राबविण्यात आला. जवळ जवळ १५० महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला. सौ.प्राजक्ता आदिनाथ निविलकर अंतिम सामन्यात यावर्षीच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.