लांजा - (वार्ताहर) - गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका ८३ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह तालुक्यातील कुरचुंब चव्हाणकोंड येथे नदीपात्रात दाभोळे सुकमवाडीच्या बाजूला आढळून आला. शुक्रवारी २८ मार्च रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजा तालुक्यातील कुरचुंब जाधववाडी येथील मनोरमा सखाराम पालांडे (८३ वर्षे) ही वृध्द महिला २७ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घरात कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. याबाबत लांजा पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर या वृद्ध महिलेचा नातेवाईक आणि पोलिसांकडून शोध घेतला जात होता. शुक्रवार दिनांक २८ मार्च रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विनय काशिनाथ पालांडे (६१ वर्षे, रा. कुरचुंब जाधववाडी) हे आपले सासरवाडीत असताना त्यांच्या वाडीतील विकास वासुदेव जाधव याने कुरचुंब चव्हाणकोंड येथे नदीपात्रात दाभोळे सुकमवाडीचे बाजूला एका स्त्री जातीचे प्रेत पूर्णपणे कुजलेल्या आणि सडलेल्या अवस्थेत असल्याचे सांगितले. यावेळी विनय पालांडे यांनी तिथे जावून खात्री केली असता तीच्या गळ्यातील माळा, कानातील कुंडी व हातातील बांगड्या तसेच अंगावरील कपड्यावरून सदरचे प्रेत हे श्रीम. मनोरमा सखाराम पालांडे यांचे असल्याचे ओळखले.
टाइम्स स्पेशल
याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे हे करत आहेत.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.