loader
Breaking News
Breaking News
Foto

बीड हादरले… मध्यरात्री मशिदीत स्फोट, दोन तरुणांची धरपकड; जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता

विविध कारणामुळे आधीच चर्चेत असलेल्या बीडमधील एका मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीड येथील अर्धमसला गावातील मशिदीत स्फोट झाला. गुढी पाडवा आणि ईद हे दोन महत्त्वाचे सण असतानाच हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. जिलेटिन कांड्यांच्या सहाय्याने हा स्फोट घडवून आणण्यात आला आहे. या स्फोटामुळे मशिदीच्या भिंतींना तडे पडले आहे. मात्र, पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनीही नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केलं आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मशिदीत रात्री 2.30 वाजता हा स्फोट झाला. दोन तरुणांनी जिलेटिन कांड्यांच्या सहाय्याने हा स्फोट घडवून आणला. त्यामुळे मशिदीच्या भिंतीला तडे गेले आहेत. तसेच मशिदीतील फरश्याही फुटल्या आहेत. या स्फोटाचा आवाज आल्याने गावातील लोक खडबडून जागी झाले. मशिदीत स्फोट झाल्याचं कळताच पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण आढावा घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. गावात आणि जिल्ह्यातील वातावरण शांत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

आज गुढी पाडवा आहे. उद्या ईद आहे. त्या आधीच हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. स्फोट घडवून आणणाऱ्यांचा नेमका हेतू काय? ते कुणाशी संबंधित आहेत? एवढ्या रात्री ते या ठिकाणी काय करत होते? ते गावातीलच आहेत की बाहेरचे याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. हे दोन्ही तरुण शेतकरी असल्याचं सांगितलं जात आहे. ते माथेफिरू असल्याचंही सांगितलं जात आहे. तसेच विहिरीच्या खोदकामासाठीचे हे जिलेटिन होते, असंही सांगितलं जात आहे. पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना आणि दोन्ही समाजाला शांतात राखण्याचे आवाहन केलं आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg