सावंतवाडी (प्रतिनिधी)- सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे सुपुत्र श्री नित्यानंद गुणाजी सावंत हे सैन्यदलातील सुभेदार मेजर या पदावरून प्रदीर्घ सेवेतून सोमवारी सिकंदराबाद आंध्र प्रदेश येथून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी 33 वर्ष एक महिना देश सेवा केली. सुभेदार मेजर सावंत यांची पुणे येथून सैन्य दलात भरती झाली पुढे त्यांना इले निक्स मेकॅनिकल इंजिनियर्स कोर (इएमइ कोर) मधील ट्रेनिंग साठी भोपाळ मध्य प्रदेश मध्ये 29 फेब्रुवारी 1992 मध्ये पाठविण्यात आले तेथून त्यांच्या शिपाई पदावर देशसेवेला सुरुवात झाली. पुढे नायक हवालदार, नायक सुभेदार, सुभेदार, सुभेदार मेजर या पदापर्यंत पोहोचले. इच्छाशक्ती, धाडस, मेहनतीच्या जोरावर त्यांनी घौडदौड केली व सुभेदार मेजर पदावरून ते आज सोमवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी 33 वर्ष देश सेवेत घालविली. त्यांनी भोपाळ मध्य प्रदेश, हिरसार हरियाणा, रांची झारखंड, पठाणकोट पंजाब, पुणे महाराष्ट्र, भूतान देश, चंदिगड पंजाब, लेह जम्मू काश्मीर, नवगांव मध्य प्रदेश, जोधपूर राजस्थान, दिमापुर नागालँड, अमृतसर पंजाब, जम्मू काश्मीर, सिकंदराबाद आंध्र प्रदेश या भागात देशसेवा केली. सुभेदार मेजर श्री सावंत यांनी 27 जून 2004 ते 14 डिसेंबर 2006 या जवळपास अडीच वर्ष कालावधीसाठी भारत देशाच्या सैन्य दलामधील तुकडी मधून भूतान देशाच्या सैन्याला मार्गदर्शन करण्यास निवड झाली होती तेथे त्यांनी आपली चोख कामगिरी बजावली.
श्री सावंत यांचे प्राथमिक शिक्षण सावंतवाडी तालुक्यातील शाळा शारदा विद्या मंदिर तळवडे नंबर 4 येथे तर माध्यमिक शिक्षण जनता विद्यालय तळवडे येथे झाले. तेथून ते पुढे मोठ्या भावाकडे सदानंद सावंत पुणे यांच्याकडे गेले. पुढील शिक्षण व सैन्य दलात काम करण्याची आवड असल्याने एका अकॅडमीत त्यांनी प्रवेश घेतला दरम्यानच्या काळात त्यांना पुणे येथील सैन्य दलातील सावंत नामक व्यक्तीचे खूपच मार्गदर्शन झाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि वडिलांच्या आशीर्वादाने, मोठ्या भावाच्या सहकार्याने आपण सैन्य दलात भरती झालो व प्रदीर्घ 33 वर्षे देशसेवा करू शकलो असे ते प्रामाणिकपणे सांगतात. मी सैन्य दलात राहून सुभेदार मेजर पदापर्यंत जाऊन मानसन्मान मिळवला. त्याबद्दल मला आनंद आहे. पण ज्यांनी मला घडवले व मार्गदर्शन केले ते दोन वेळेला शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त करणारे माझे वडील गुणाजी सावंत यांच्यामुळे शक्य झाले. ते आज हयात नाहीत त्याचे दुःख मला आहे. माझ्या देशसेवेबद्दल त्यांना निश्चितच आनंद झाला असता असे सुभेदार मेजर श्री.सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.