loader
Breaking News
Breaking News
Foto

चुलीवर शेकोटी घेताना होरपळलेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील वेरळ येथे चुलीवर शेकोटी घेत असताना भाजून जखमी झालेल्या वृद्धेचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवार 29 मार्च रोजी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. जयश्री बबन घोरपडे (वय 70, रा. वेरळ, खोपी फाटा खेड, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे. याबाबत अधिक माहितीनुसार शुक्रवार दि. 7 मार्च रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास त्या घरी एकट्याच असताना चूल पेटवून त्याकडे पाठ करून शेकोटी घेत होत्या. या घटनेत त्यांच्या अंगावरील साडीने पेट घेतल्याने त्यांची पाठ आणि दोन्ही पाय भाजून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने कळंबणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg