loader
Breaking News
Breaking News
Foto

रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्याचा चाकरमान्यांचा निर्धार

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारसू रिफायनरी प्रकल्प उभारू अशी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री यांच्या विधानाने बारसू - सोलगाव पंचक्रोशीवरील प्रदूषणकारी रिफायनरीचे संकट अजून पूर्णपणे टळलेले नाही. रिफायनरीचा प्रस्ताव भविष्यात कधीही आला तर त्याला संविधानिक मार्गाने विरोध करण्याचा निर्धार बारसू - सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेच्या मुंबईतील सभेत घेण्यात आला. बारसू - सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे मार्गदर्शक सत्यजित चव्हाण यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून रविवारी दि. 30 मार्च रोजी मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी संघटनेचे अध्यक्ष वैभव कोळवणकर, सरचिटणीस नरेंद्र ऊर्फ अप्पन जोशी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत लवकरच पंचक्रोशीतील मुंबईकर व स्थानिक ग्रामस्थ यांची जाहीर बैठक लावण्याचे निश्चित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg