सावंतवाडी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत सैनिक स्कूलने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान राज्यभर सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबविण्यात आले. भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करीत असतानाच शाळेचे विद्यार्थी विषयक व गुणवत्ताविषयक कामकाजाचे मूल्यांकन करण्यात आले. पायाभूत सुविधा शासन ध्येय धोरण अंमलबजावणी शैक्षणिक संपादणूक यासाठी गुणांकन करण्यात आले. तज्ञ समस्यांच्या मूल्यांकन समितीने प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन विविध कसोट्यांवर मूल्यांकन केले.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक, गुणवत्ता, विकास, आरोग्य, स्वच्छता, क्रीडा, पर्यावरण घटनांबाबत जागृती करून विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासास चालना देणे, शासनाच्या ध्येय धोरणांचे सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरण चालना देणे, शैक्षणिक संपादणूक प्रभावीपणे होणे - प्राप्त करणे ही वैशिष्ट्ये साध्य करण्यात आली. ’मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियान अंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने सन २०२३-२४ या वर्षात तृतीय क्रमांक व सन २०२४-२५ या वर्षात प्रथम क्रमांक पटकावत दर्जेदार अध्यापनाचा वारसा कायम ठेवला. प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह व रोख रक्कमेचे पारितोषिक सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, प्रमोद पावस्कर- शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या हस्ते देऊन शाळेला गौरवण्यात आले.
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानात प्रथम क्रमांक सैनिक शाळेला मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सन २०२५-२६ या वर्षाची इयत्ता ६ वी व ११ वी (विज्ञान) शाखेसाठी प्रक्रिया प्रवेश सुरू झाली आहे. तसेच इतर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी साहसी व्यक्तिमत्व विकास निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक पालकांनी ९४२०१९५५१८ / ७८२२९४२०८१ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन शाळेचे कार्यकारी अध्यक्ष सुनील राऊळ व प्राचार्य नितीन गावडे यांनी केले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.