loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना संरक्षण मंत्रालयाची कर्नल कमांडट मानद

दापोली (जितेंद्र गावडे) : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांना संरक्षण मंत्रालयाने कर्नल कमांडट ही मानद उपाधी जाहीर केली असून भारत सरकारच्या राजपत्रामध्ये हि माहिती देण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. संजय भावे यांचे शिक्षणही कोकण कृषी विद्यापीठामध्ये झालेले असून शिक्षण घेत असताना ते राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) चे 3 वर्ष छात्र (कॅडेट) होते. तर त्यांनी 1979 ते 1982 या काळात सिनिअर अंडर ऑफिसर म्हणूनही काम केले आहे. कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या सेवेत आल्यावर त्यांनी 7 वर्षे सहयोगी राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल संरक्षण मंत्रालयाने घेवून त्यांना कर्नल कमांडट हि मानद उपाधी जाहीर केली आहे. एप्रिल महिन्यात एनसीसीचे मुंबई येथील अतिरिक्त महासंचालक, कोल्हापूर येथील ब्रिगेडीअर तसेच बटालीअन कर्नल यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात कुलगुरू डॉ. संजय भावे यांना हि उपाधी प्रदान करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हि उपाधी प्राप्त करणारे डॉ. संजय भावे हे या विद्यापीठाचे चौथे कुलगुरु असून यापूर्वी डॉ. विजय मेहता, डॉ. शंकरराव मगर व डॉ. संजय सावंत यांना हि उपाधी प्रदान करण्यात आली होती. संरक्षण मंत्रालयाने 13 विद्यापीठांच्या कुलगुरूंना हि उपाधी जाहीर केली असून त्यातील केवळ 2 विद्यापीठांचे कुलगुरू महाराष्ट्रातील असून त्यात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे डॉ. संजय भावे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांचा त्यात समावेश आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg