रत्नागिरी (वार्ताहर) : सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेने कमालीचे सातत्य, प्रमाणबद्धता व विश्वासार्हता यांचा अर्थविष्कार करत आपल्या व्यवसायात १४.३४% वृद्धी नोंदवली. संस्थेच्या सर्वच शाखांमध्ये व्यवसाय वृद्धी झाल्याचे दिसून येते. आपला वसुली विक्रमाचा पायंडा अधिक मजबूत करत यावर्षीही सर्व कर्जदारांच्या उत्तम सहकार्यामुळे ९९.७१% कर्ज वसुली केली असून संस्थेचा यॉस NPA केवळ ०.६२% तर नेट NPA 0% राखण्यात संस्था यशस्वी झाली. सलग १७ वर्ष संस्थेने आपली वसुली ९९% चे वर राखत NPA तरतूद लागू झाल्यापासूनच संस्थेने नेट NPA 0% राखला असून संस्थेच्या ८ शाखांची वसुली १००% झाली आहे. या आर्थिक वर्षात १४.३४% व्यवसाय वृद्धी झाली. संस्थेचा सीडी रेशो ६३.६७% इतका आदर्श प्रमाणात राहिला असून भांडवल पर्याप्तता अर्थात CRAR २८.७०% इतके भक्कम राहिले आहे. याचा अर्थ संस्थेकडे जमा झालेला सर्व पैसा सर्वोत्लम विनियोगात आल्याने यावर्षी निव्वळ नफ्यात १८.३४% इतकी वाढ नोंदवत संस्थेने ८ कोटी ३२ लाखांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवीत १२.१४% ने वाढ झाली असून संस्थेच्या ठेवी ३४६ कोटी २१ लाख झाल्या आहेत. संस्थेचे कर्ज वितरणात १७.२०% वाढ झाली असून संस्थेचे कर्ज रु.२५२ कोटी ६४ लाख झाले असून हे कर्ज वितरण २३ हजार १९९ कर्ज खात्यांचे माध्यमातून झाले आहे. संस्थेने स्टॅट्यूटरी गुंतवणूकही २५% प्रमाणात राखत रु.१०० कोटी २७ लाख एवढी गुंतवणूक केली असून संस्थेने आपले विविध कारणांसाठी निर्माण केलेल्या निधीपोटी रु.४८ कोटी ७३ लाख गुंतवणूक केली असून संस्थेची एकूण गुंतवणूक रुपये १४९ कोटी झाली आहे. संस्थेचा स्वनिधी रु.४८.१३ लाख झाला असून संस्थेचा इमारत निधी रु.२२ कोटींचा झाला आहे. सर्वच आघाड्यांवर स्वरूपानंद पतसंस्थेने अत्यंत उत्तम काम करत आर्थिक शिस्त काटेकोरपणे सांभाळत उत्तम रिझल्ट दिले आहेत. संस्थेची भक्कम आर्थिक स्थिती ही ठेवीदारांचा संस्थेवरचा विश्वास अधिक वृद्धिंगत करणारी असून आपली ठेव गुंतवण्यासाठी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव योजनांचा गुंतवणूकदार प्राधान्याने विचार करतात. यामुळेच संस्थेकडे ८४ हजार ठेव खाती झाली आहेत. नवीन आर्थिक वर्षाल ४०० कोटींचा ठेव टप्पा ओलांडण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून संस्था काम करेल. नवीन आर्थिक वर्षात ५ नवीन शाखा मंजूर करून घेऊन किमान ३ शाखांचा प्रारंभ सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात करणार आहोत.
संस्थेच्या कर्ज मर्यादेत कोटी वरून ५ कोटी पर्यंत वाढ करण्याचा प्रयत्न करून नव्या कर्ज योजना सुरु करू तसेच संस्थेच्या व्यवहारांची, उपक्रमांची व सहकार जगताची माहिती सभासदांपर्यंत पोहोचवण्यासाठी जून २०२५ पासून सहकार स्वरूप मासिक सुरु करण्यात येणार आहे. संस्थेच्या नुतन स्ववास्तूचे कामाचा प्रारंभ झाला असून ही ५ मजली स्वमालिकेची वास्तू सुसज्ज पद्धतीत वेगवान काम करत पूर्ण करण्यासाठी उचित यंत्रणा सक्रिय केली आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात संस्थेच्या ग्राहक सभासदांनी दिलेल उत्तम सहकार्य, ठेवीदार सभासदांनी ठेवलेल्या ठेवी, कर्जदार सभासदांनी घेतलेल कर्ज व केलेली नियमित परतफेड, कर्मचारी, अधिकारी, पिग्मी एजंट यांनी केलेल उत्तम काम या उत्तम सहकार शृंखलेमुळे संस्थेची उत्तम अर्थकारणाची परंपरा सन २०२४-२५ मध्येही तेजस्वी राहीली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतानाच स्वरूपानंद पतसंस्थेने कमालीचे सातत्य राखत प्रमाणबद्ध आर्थिक व्यवहार शिस्तीने आणि विश्वासार्ह पद्धतीने केल्याने हे यश प्राप्त झाले असे प्रतिपादन अॅड. दीपक पटवर्धन अध्यक्ष स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था यांनी केले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.