मालवण(प्रतिनिधी)- मालवण येथे हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण तसेच वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना काल हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनंतर रात्री मालवण नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत रोख रक्कम व सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धेत शहर परिसरातील विविध शाळांमधून सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर वेशभूषा स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे - रंगभरण स्पर्धा - इयत्ता पहिली ते चौथी अनुक्रमे - हर्षद उपेंद्र पाटणकर (जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल), हर्षदा गौरव सावबा ( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुरीवाडा), अनुज निलेश हिरे (रघुनाथ देसाई विद्यालय), उत्तेजनार्थ प्रथम - हिताक्षी संतोष सारंग (अंबाजी विद्यालय वायरी मालवण), द्वितीय - भूमी भूषण परसनाईक (भंडारी प्राथमिक शाळा), तृतीय - रेविना लॉईड फर्नांडिस (रोझरी इंग्लिश स्कूल मालवण), चतुर्थ - अवनी सुजित परब(प्राथमिक कन्या शाळा मालवण), पाचवा - गौरी हाकाराम मीना (मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा). पाचवी ते सातवी अनुक्रमे - सानवी सचिन पेडणेकर (रोझरी इंग्लिश मीडियम स्कूल), चिन्मयी अमोल निकम (जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल), रुद्राक्ष सतीश खवणेकर (भंडारी हायस्कूल), उत्तेजनार्थ प्रथम - मैथिली मयूर राजापूरकर (टोपीवाला हायस्कूल मालवण), द्वितीय - तन्वी ललित मेस्त्री (श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय वायरी मालवण), तृतीय - धनश्री प्रशांत परब ( जिल्हा परिषद रेवतळे शाळा), चतुर्थ - स्वरा शैलेश मालंडकर (रोझरी इंग्लिश स्कूल), पाचवी - वेदा किशोर बिळवसकर (रोझरी इंग्लिश स्कूल) वेशभूषा स्पर्धा - बालगट अनुक्रमे - अभिज्ञा मुणगेकर, स्वर्णिका प्रभू, राहील तायशेटे, इयत्ता तिसरी ते पाचवी - सान्वी प्रभू, निहार कोचरेकर, सिया कदम, इयत्ता सहावी ते आठवी - रेवा जोशी, स्वर्णीम काळसेकर, निर्भया जाधव, महिला पुरुष खुला गट - शांती तोंडवळकर, बन्सी पटेल, श्वेता यादव, मोहिनी हडकर, सावित्री पटेल. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचे संयोजक प्रशांत हिंदळेकर, विजय केनवडेकर, भाऊ सामंत, विलास हडकर, बंटी केनवडेकर, अमित खोत, बबन शिंदे, रत्नाकर कोळंबकर, अरविंद मयेकर, शिल्पा खोत, यतीन खोत, आप्पा लुडबे,अनिकेत फाटक, श्रीराज बादेकर यांच्यासह अन्य सदस्य, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.