loader
Breaking News
Breaking News
Foto

तहसीलदार वर्षा झाल्टे यांची महत्वपुर्ण कामगिरी; बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतूकीविरोधात कारवाईचा बडगा ---

मालवण(प्रतिनिधी)- मालवण तालुक्यात बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतूकीला जोर वाढला असताना मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी गेले काही दिवस या वाहतूकी विरोधात कारवाईचा बडगा उचला असतानाच ऍक्शन मोडवर असलेल्या तहसीलदार थेट रस्त्यावर उतरल्या आहेत. तहसीलदार कारवाईसाठी रस्त्यावर उतरल्याचे कळताच अनेक डंपर चालकांची पळापळ होऊन त्यांनी इतर मार्गानी पोबारा केल्याचे समजते. कालावल तसेच कर्ली खाडी पात्रात बेकायदेशीर उत्खनन सुरु आहे. उपसा केलेली वाळू डंपर द्वारे निश्चित ठिकाणी पोहचविण्यात येत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळूची विना परवाना वाहतूक सुरु आहे. अवैध वाळू उपसा तसेच डंपर द्वारे राजरोसपणे सुरु असलेली वाळूची वाहतूक याबाबत ग्रामस्थांमधून आवाज उठविला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे या महसूल अधिकारी व कर्मचार्‍यांसह मालवण देऊळवाडा येथील रस्त्यावर स्वतः कारवाईसाठी उतरल्या. देऊळवाडा येथील नाक्यावरून कसालच्या दिशेने तसेच बेळणे कणकवली च्या दिशेने अनेक वाळूचे डंपर वाहतूक करतात. त्यामुळे या नाक्यावर तहसीलदार यांनी काही काळ तळ ठोकला. यामुळे या मार्गांवरुन जाणार्‍या डंपर चालकांची पंचाईत झाली. तहसीलदारांच्या या बेधडक भूमिकेमुळे वाळू डंपर चालकांची पळापळ झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg