loader
Breaking News
Breaking News
Foto

ब्राह्मण संघाच्या अध्यक्षपदी घनःश्याम जोशी तर उपाध्यक्षपदी बाळकृष्ण ओक; गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघाची नवीन कार्यकारीणीची जाहिर ---

वेळणेश्वर (उमेश शिंदे)- वेगाने बदलणार्‍या तंत्रज्ञानाच्या युगाला सामोरे जाण्याचे बळ ब्राह्मण समाजाला देण्यासाठी काम करावे लागेल. त्यासाठी समाजातील विविध क्षेत्रात यशस्वी असलेल्या समाज बंधु भगिनींचे सहकार्य हवे आहे. असे प्रतिपादन गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघाचे नवनियुक्त उपाध्यक्ष बाळकृष्ण ओक यांनी केले. ते गुहागर खालचापाट येथील लक्ष्मीनारायट मंदिरात ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सर्वसाधारण सभेत बोलत होते. गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघाच्या नवीन कार्यकारीणीची बिनविरोध निवड झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये नाट्यक्षेत्रात नावाजलेले वाघांबे येथील घनःश्याम जयराम जोशी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. लाकुड व्यावसायिक, गुहागर तालुका रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष वेळंबचे बाळकृष्ण ओक यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कृषी क्षेत्रातील अभ्यासक म्हणून ओळख असलेले मिलिंद गाडगीळ यांनी सरचिटणीस म्हणून तर हिशोब तपासनीस व्यावसायिक जितेंद्र गद्रे यांची सह सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. आरेगांवमधील बागायदार व कोकम सरबताचे उत्पादक म्हणून ओळख असलेले श्रीकांत वासुदेव ओक यांनी खजिनदार म्हणून निवड करण्यात आली तर लक्ष्मी नारायण केबल नेटवर्कचे संस्थापक संचालक महेश वसंत जोशी पालशेत यांची सह खजिनदार म्हणून निवड करण्यात आली. कार्यकारणी मध्ये गुहागरमधील लायन्स क्लबचे मेंबर, सुपारीचे व्यापारी मनिष खरे, उद्योजक प्रसाद वैद्य, बागायतदार योगेश सोमण वडद, वकीली क्षेत्रात कार्यरत ऍड. आदित्य भावे पालशेत, नरवणमधील विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे व पौरोहित्य करणारे राहुल ओक, कुडलीचे दिनानाथ निमकर, गुहागर विजापूर महामार्गाबाबतचा लढा देणारे दिपक परचुरे व सचिन खरे आणि कृषी विभागात शासकीय सेवेत असलेले कौंढरचे मंदार जोशी यांची निवड करण्यात आली.नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी लगेचच याच सभेत पुढील पाच वर्षांच्या कामाची दिशा सांगितली. आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात सबलीकरणासाठी समाजबांधवांचे गट स्थापन करणे, त्या गटाच्या सूचनांप्रमाणे समाजात क्रियान्वयन करणे, सभासद नोंदणी, तालुक्यातील ब्राह्मण समाजाचा अद्ययावत डाटा तयार करणे अशा विविध मुद्द्यांवर काम करणार असल्याचे यावेळी बाळकृष्ण ओक यांनी सांगितले. सभासदांनी नवनियुक्त कार्यकारीणीला शुभेच्छा दिल्या. पसायदानाने सभेची सांगता झाली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg