loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी बाळासाहेब खेडेकर

खेड (वार्ताहर) : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख पदासाठी माजी शहरप्रमुख तथा माजी समाजकल्याण सभापती बाळासाहेब खेडेकर यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. चिपळूण येथील बाळासाहेब माटे सभागृहात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावाला पसंती देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या महितीनुसार गुहागर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड या पाच तालुक्यातील शिवसैनिक, युवसैनिक, महिला आघाडीप्रमुख यांची बैठक शिवसेना नेते आम. भास्करशेठ जाधव यांच्या उपस्थितीत चिपळूण येथे पार पडली. खेड दापोली मंडणगड येथील दोन माजी आमदार आणि एक विद्यमान आमदार यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने या तालुक्यात पदाधिकारी यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहणारा आक्रमक नेता पाहिजे असल्याची भावना शिवसेना उपतालुका प्रमुख सचिन निकम यांनी बोलून दाखवली. त्याला प्रतिसाद देत उपजिल्हाप्रमुख प्रताप शिंदे यांनी देखील जिल्हाप्रमुख पद हे खेड, दापोली, मंडणगड यांनाच देण्याबाबत सकारात्मकता दाखवली. याबैठकीत खेड नगरपालिकेचे माजी गटनेते आणि माजी शहरप्रमुख बाळासाहेब खेडेकर यांच्या नावाला सर्वांनी सहमती दर्शवल्याने उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख पदी त्याची वर्णी लागण्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे. चिपळूण येथील बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर आम.भास्करराव जाधव यांनी पक्ष नेतृत्वापर्यंत आपण या भावना पोहचवणार असल्याचे सांगत उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख पदाची घोषणा जाहीर सभा घेवून लवकरच होणार असल्याचे सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg