loader
Breaking News
Breaking News
Foto

सलग सुट्‌ट्यांमुळे समुद्रकिनार्‍यांवर गर्दी

संगलट-खेड (इक्बाल जमादार) - तीन दिवस लागून आलेल्या सलग सुट्‌ट्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये मुरुड हरणे समुद्र किनार्‍यांवर पर्यटकांनी गर्दी केलीे. हजारो पर्यटक समुद्र किनार्‍यांवर दाखल झाले होते. किनार्‍यांवर मनसोक्त मौजमजा करीत पर्यटकांनी सुट्टीचा आनंद घेतला. शनिवार-रविवारला लागून आलेली रमजान ईदची सुट्टी. त्यातच सरकारने शाळेच्या वार्षिक परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत घेण्याचे जाहीर केल्याने पर्यटक घराबाहेर पडले आहेत. सलग तीन दिवस सुटी मिळाल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच पुणे जिल्ह्यातील हजारो पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात दाखल झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पर्यटकांनी समुद्र स्नानाबरोबरच सागरी सफरीचा आनंद लुटला. जल बोटींगच्या विविध प्रकारांचा आनंद लुटला. घोडेसफारी आणि उंट सफारी केली. पर्यटकांचा ओघ वाढल्याने जिल्ह्यातील हॉटेल्स आणि लॉजेस पर्यटकांनी गजबजून गेले होते. त्यामुळे पर्यटनावर आधारित उद्योगांना सुगीचे दिवस आल्याचे दिसून आले. दिवाळीनंतर सुरू झालेला पर्यटन हंगाम अशा सलग सुट्यांच्या काळात अधिकच बहरलेला पहायला मिळाला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg