loader
Breaking News
Breaking News
Foto

सुट्ट्या असूनही तीन दिवस मंत्रालयात अधिकारी का ठाण मांडून होते?

मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी नेहमीच जनसेवेसाठी तत्पर असतात. नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्यांची वेगवेगळी कामे मार्गी लावण्याचा मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रयत्न असतो. मात्र, तरीही त्यांच्यावर टीका होते. आता यावर्षी शनिवार, रविवार आणि सोमवार अशा जोडून सुट्टया आल्या होत्या. मात्र, तरीही मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी तीन दिवस मंत्रालयात ठाण मांडून होते. काल आर्थिक वर्ष 2024-25 चा शेवटचा दिवस होता. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी 31 मार्च रोजी शासकीय सुट्टी असतानाही मंत्रालयात कक्षाधिकारी ते सचिवस्तरापर्यंचे अधिकारी ठाण मांडून होते. सोमवारी शेवटच्या दिवशी शासनाच्या विविध विभागांचे 177 पेक्षा अधिक शासन निर्णय काढण्यात आले. हे सर्व निधी वितरणाचे निर्णय आहेत. 26 मार्च रोजी विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले. तीन आठवड्यांच्या अधिवेशनानंतर लागलीच वित्त विभागाने मंजूर केलेल्या निधी वितरणाची धांदल सुरू झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आर्थिक वर्षाच्या शेवटी शनिवार, रविवार गुढीपाडवा आणि सोमवार ईद अशा तीन दिवस शासकीय सुट्ट्या आल्या. चालू आर्थिक वर्षातील मंजूर निधी 31 मार्चपर्यंत वितरीत न झाल्यास तो परत जातो. त्यामुळे सुट्ट्या असूनही गेली तीन दिवस मंत्रालयात अधिकाऱ्यांची धावपळ होती. आदिवासी घटक कार्यक्रम अनुदान, आश्रमशाळांचे अनुदान, बाह्यस्राोतांद्वारे मनुष्यबळाचा पुरवठा केलेल्यांची देयके, महोत्सवांचे अनुदान, सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीचा निधी, धरणातील गाळ काढलेल्या संस्थांचे अनुदान, क्रिडा संकुलांसाठी निधी, अतिवृष्टीतील नुकसान भरपाई, इमारती बांधकाम अनुदान, संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे अनुदान असे हजारो कोटींच्या निधीचे वितरण शेवटच्या दिवशी करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg