महाराष्ट्रात, मुंबईत कामासाठी रोज लाखो लोकं येत असतात. मराठी ही महाराष्ट्राची आणि मुंबईची मुख्य भाषा आहे. जैसा देश वैसा भेस असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे आपण जिथे राहतो, तिथली मूळ भाषा आलीच पाहिजे, बरेच जण मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात. पण काही जण आपल्याच भाषेवर कायम राहत मराठी भाषा शिकण्याचा काय त्याचा उल्लेखही करत नाही, मग्रूर वर्तन करतात. मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान करण्याच्या घटना गेल्या काही वर्षांच बऱ्याच वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात मराठी भाषा आणि मराठी अस्मिता यावर पुन्हा वक्तव्य केलं. उद्यापासून कामाला लागा, महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही चेक करा. प्रत्येक अस्थापनेत ही बाब तपासून पाहा, असे आदेश राज ठाकरे यांनी दिली. राज साहेबांचा हा आदेश शिरसावंद्य मानत मनसैनिक झडझडून कामाला लागले असून ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांची बँकेवर धडक मारली. बँकेतील सर्व व्यवहार मराठीत असणं अनिवार्य करावे, अशी मागणी मनसेने केली. बँकेतील व्यवहार मराठीतून झाले पाहिजेत, असं राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात सांगितल्यानंतर मनसैनिक अलर्ट मोड मध्ये आहेत. बँकांमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का हे बघा. नसेल तर त्यांना करायला लावा, असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता.
त्यांच्या याच आदेशाचे पालन करत मनसे नेते अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरेसह इतर पदाधिकाऱ्यांनी बँकेला निवेदन दिलं. Sbi बँकेतील बँक मॅनेजरच्या केबिन मध्ये जाऊन जाबही विचारला. बँकेतील कार्यालयात कुठेच मराठीत आढळून येत नसल्याचे मनसेने निदर्शनास आणले . बँकेत मराठी मातृभाषा लवकर बदला. आता हात जोडून येतो नंतर हात सोडून येणार , मराठी दिसली नाही तर मनसे स्टाईल दाखवणार , असा इशारा मनसेकडून बँक मॅनेजरला देण्यात आला. तसेच त्यांनी बँक मेनजरला निवेदनही दिलं. उद्यापासून सर्व बोर्ड मराठीत असले पाहिजे, स्टाफ, कामावर देखील मराठी माणसं असली पाहिजे, त्या माणसांनी मराठी बोललं पाहिजे अशी ताकीद त्यांनी दिली. मात्र हा बदल दिसला नाही तर मनसे सामोरे जाणार , असा इशाराही त्यांनी दिला. कर्नाटक बँकेत जाणार होतो. काही बँका बंद आहेत उद्यापासून पुन्हा सरकारी आणि खाजगी बँकांना निवेदन देणार. मराठीत कारभार झाला नाही तर सर्व बॅनर्स बँकेत आम्ही स्वखर्चाने लावणार. मराठी व्यवहार झाला नाही तर आणि बॅनर जर लावला नाही तर फुकट मार खाल . मराठी माणसाबाबत, मराठीचा खरंच अपमान होत असेल तर आमची लाथ आणि हात दोन्ही गोष्टी पडतील, असा इशाराच मनसैनिकांनी दिला आहे.
दरम्यान वाहतूक शाखेकडून मराठीची उपेक्षा होत आहे. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर हुजूरपागा , नू म वि शाळेजवळ वाहतुकीचे नियम कळावेत म्हणून अनेक ठिकाणी फलक लावले आहे परंतु हे सर्व फलक इंग्रजीत आहेत. महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे याचा वाहतूक शाखेला विसर पडला आहे यामुळे मनसेतर्फे आज 12 वाजता निषेध करण्यात येणार असून, त्यांना मराठी भाषेची आठवण करून देणारे याच फलकाखाली सदर (मराठी) फलक लावण्यात येणार आहेत.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.