loader
Breaking News
Breaking News
Foto

चाफे येथे ट्रक-मोटरसायकल भीषण अपघातात दुचाकीस्वाराचे निधन; ग्रामस्थांनी ट्रक पेटविल्याची शक्यता

रत्नागिरी (वार्ताहर) : रत्नागिरी तालुक्यातील जयगड-निवळी मार्गावर आज चाफे येथे ट्रक आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. अपघातात मोटरसायकलस्वाराला दीड किमी.पर्यंत ट्रकने चिरडत नेले. त्यामुळे किरण पागडे, चाफेरी याचा मृत्यू झाला. हा प्रकार घडल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी ट्रक पेटवून दिला, असे म्हटले जात आहे. मात्र घटनास्थळी टेम्पोला आग लागली असावी, अशी शक्यता ही आहे. पोलिस याची खातरजमा करीत आहेत. एखाद्या वाहनाला अपघातानंतर आग लागावी, अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडली आहे. जयगड-निवळी रस्त्यावरची अवजड वाहनांची वाहतुक ग्रामस्थांनी रोखून धरली आहे. किरण पागडे हा चाफेरी येथून रत्नागिरीकडे कामानिमित्ताने निघाला होता. त्याचा मृतदेह जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आल्याने ग्रामीण पोलिस घटनास्थळी पोहचले असून तपास सुरु आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg