loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या बालवाटिका विभागात दीक्षांत समारंभ संपन्न

खेड (प्रतिनिधी) : रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या बालवाटिका विभागात सिनियर के. जी. च्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना वृक्षांचे संवर्धन व संगोपन कसे करावे याचे महत्त्व कळावे यासाठी सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांच्या शुभहस्ते औषधी वनस्पतींना जल अर्पण करून करण्यात आली. यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे पुस्तकरुपी भेट देऊन स्वागत करण्यात आले. तद्नंतर सिनियर के. जी. च्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून दीक्षांत समारंभाचा प्रारंभ केला. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या बोबड्या बोलातून शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर प्रमुख मान्यवर रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांच्याहस्ते रोटरी स्कूलच्या बालवाटिका विभागातील विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानंतर शाळेच्या पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. प्रितम वडके यांनी पालकांना आपल्या पाल्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी, पालकांनी आपल्या पाल्याला अधिकाधिक वेळ द्यावा, त्यांचे छंद त्यांना जोपासायला मदत करावी, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव द्यावा, असे सांगून लहानग्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुप्रिया रांगले व सौ. स्वाती गिल्डा यांनी केले. यावेळी शाळेचे उच्चमाध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. प्रितम वडके व पालक प्रतिनिधी, सर्व शिक्षक व पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी पूर्व प्राथमिक विभागातील सर्व शिक्षिका यांनी चिमुकल्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg