loader
Breaking News
Breaking News
Foto

तिलारी घाटातील एसटी बस सेवा प्रतिक्षा संपली; प्रवाशांना दिलासा

दोडामार्ग (प्रतिनिधी) : गोवा ते दोडामार्ग तिलारी घाट मार्गे गेले नऊ महिने या घाटातील चाळीस वर्षे सुरू असलेली एस टी बस सेवा बंद होती. ती सुरू करावी यासाठी उपोषण, रस्ता रोको, आंदोलन देखील केले. अखेर तिलारी घाटातील खचलेल्या संरक्षण भिंत बांधकाम केले. एस विभाग नियंत्रण विभाग कोल्हापूर यांनी पुन्हा सर्व्हेक्षण केले. यात काही वळणावर आरसे बसवा ही मागणी मान्य केली. यानंतर कोल्हापूर विभाग नियंत्रण अधिकारी यांनी २ एप्रिल पासून तिलारी घाट मार्गे सर्व एसटी बस सेवा पुर्ववत सुरू कराव्या अशा सूचना सर्व आगारांना दिल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची प्रतिक्षा संपली आहे. बुधवारपासून प्रवाशांना त्यांच्या हक्काच्या लालपरीमधून प्रवास करायला मिळणार आहे. यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गोवा दोडामार्ग ते तिलारी घाट मार्गे कोल्हापूर, पुणे, बेळगाव, हुबळी, जवळचा मार्गे या घाटातून गेल्या चाळीस वर्षापासूनच एसटी बस सेवा सुरू होती. पण काही अवजड वाहने यामुळे झालेले अपघात यामुळे पावसाळ्यात कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन तिलारी घाटातून अवजड वाहने एसटी बस यांना २१ जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान बंदी घातली होती. पण अवजड वाहने सुरू होती यावरून पोलिस व बांधकाम विभाग प्रशासन यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. तिलारी घाटातून बंदी मुदत संपली तरी बसेस सुरू झाल्या नव्हत्या. सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस, कोदाळी सरपंच, स्थानिक युवक यांनी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे उपोषण केले होते. शिवाय गडहिंग्लज प्रांताधिकारी, यांची भेट घेतली होती. शिवाय तिलारी नगर येथे दोन तास रस्ता रोको आंदोलन देखील केले होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg