loader
Breaking News
Breaking News
Foto

समर्थ गड - आडवली येथे स्वामी जयंती सोहळा उत्साहात; ३ एप्रिल रोजी कार्यक्रमांची सांगता ---

मालवण (प्रतिनिधी)- मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ समर्थ गड - आडवली येथे श्री स्वामी समर्थ जयंती सोहळा भाविकांच्या मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्त ०३ एप्रिल पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी प्रकटदिनी सकाळी विधिवत पूजा, सकाळी भक्तांना दर्शन, दुपारी महाआरती, दुपारी महाप्रसाद, दुपार नंतर हळदी कुंकू, रात्री महाआरती, व त्यानंतर पारंपरिक डबलबारी भजन सामना बुवा श्रीधर मुणगेकर विरुद्ध बुवा लक्ष्मण गुरव यांच्यात झाला. २ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता हिंदी वाद्यवृंद (चिमणी पाखरं)नृत्य-अविष्कार, भन्नाट कॉमेडी, मिमिक्री. ३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता सांगता सोहळा विधिवत पूजा, रात्री ८ ते ८.३० महाआरती, रात्री ९ वाजता २०-२० डबलबारी भजन सामना बुवा संदीप लोके विरुद्ध बुवा अजित मुळम या दोहोच्यात हा सामना होणार आहे. उपस्थितीचे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ समर्थ गड - आडवली यांच्या वतीने भाई महाराज यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg