loader
Breaking News
Breaking News
Foto

पोईप येरमवाडी रस्ता कामासाठी ग्रामस्थांचे दत्ता सामंत यांना निवेदन ---

पोईप(वार्ताहर)- मालवण तालुक्यातील पोईप येरम म्हसकरवाडी मध्ये जाणारा रस्ता पूर्णतः खराब झाल्याने याबाबत पोईप येरम म्हसकरवाडीतील तरुण सहकार मंडळाचा कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना वाडीत आमंत्रित करून त्यांना शिल्लक रस्ता कामाबाबत ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन दिले. याबाबत आपण लवकरच वाडीतील ग्रामस्थांच्या मागणी प्रमाणे रस्ता काम करून देवू, असे आश्वासन यावेळी दत्ता सामंत यांनी ग्रामस्थांना दिले. पोईप येरम म्हसकरवाडी येथील तरुण सहकार मंडळाच्या कार्यालयात रहिवाश्यांच्या वतीने जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर दत्ता सामंत यांच्या समवेत पोईप सरपंच श्रीधर नाईक, माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, संतोष पालव, पुरुषोत्तम शिंगरे, नाना परब, पंकज वर्दम, जितेंद्र परब, कमलेश प्रभू, मुंबई मंडळाचे अध्यक्ष महेश येरम, माजी सेक्रेटरी शिवराम येरम, माजी अध्यक्ष अनंत येरम तसेच तरुण सहकार मंडळाचे मुंबई व ग्रामीण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोईप धरण ते सचिन पालव घरापर्यंत सुमारे ७०० मीटर रस्ता असून यातील २०० मीटर रस्ताकाम नुकतेच पूर्ण झाले आहे. वरील ५०० मीटर खडीकरण डांबरीकरण रस्ता कामासाठी तसेच रस्ता दुतर्फा गटाराची मागणी यावेळी ग्रामस्थांनी दत्ता सामंत यांच्याकडे केली. पावसाळ्यात जुन्या रस्त्याला गटारे नसल्याने पावसाचे पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने ग्रामस्थांनी रस्ता बरोबर गटाराची मागणी केली. याबाबत बोलताना दत्ता सामंत यांनी सांगितले की, मागील कित्येक वर्षे या वाडीतील ग्रामस्थ उबाठा शिवसेनेच्या पाठीशी राहिले असून ग्रामस्थांना अपेक्षेप्रमाणे आपली विकासकामे झाली नसल्याने आज १५ वर्षानंतर ग्रामस्थ आपल्या संपर्कात आले आहेत. चालू आर्थिक वर्षातील कामे जवळपास पूर्ण झालेली नसून या वाडीतील रस्ता काम आपल्या पर्यंत उशिराने आले आहे. परंतु ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे नाहीतर यातील काही मीटर रस्ता आपण स्वखर्चाने लवकरच पूर्ण करून देवू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या वाडीतील रहिवाशांनी आपल्याला दिलेले निवेदन व विश्वास याबाबत आपण नक्कीच सकारात्मक कार्यवाही करू असे ते म्हणाले. याबाबत दत्ता सामंत यांना लवकरच आपण शिंदे गटात प्रवेश करू असे आश्वासन दिले. दत्ता सामंत यांनी वाहतुकीस अयोग्य झालेल्या संपूर्ण रस्त्याची पाहणी करून रस्ता कामाचा अंदाज घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामसुंदर येरम यांनी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg