loader
Breaking News
Breaking News
Foto

तळघर मराठी शाळेत स्पोर्टस् कीटचे वाटप!

खेड (वार्ताहर) : तालुक्यातील तळघर येथील शिवप्रतिष्ठान मित्रमंडळाच्या सौजन्याने जि.प.पू.प्राथ. शाळा तळघर मराठी शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा नंदिनी बुदर, उपाध्यक्ष वासुदेवराव साळवी, माजी अध्यक्ष दगडूभाऊ नेवरे व शंकरजी भुवड यांच्या उपस्थितीत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांचे स्पोर्ट्स किट्सचे वाटप करण्यात आले. शाळेतील विविध उपक्रमाचे नियोजन पाहून सर्व सदस्यांनी शाळेची असणारी गरज पहाता सर्व विद्यार्थ्याना हे स्पोर्टस कीटचे वाटप करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पोर्टस कीटचे वाटप करण्यासाठी सर्वश्री गणेश कांदेकर, जानु धामणे, अक्षय धामणे, सुभाष धामणे, सचिन धामणे, पांडुरंग भुवड, राजेश फावरे, प्रविण फावरे, अक्षय फावरे, अरविंद फावरे, अनंत फावरे, अंकुश फावरे, विजय फावरे, संदिप फावरे, प्रदिप फावरे, लक्ष्मण फावरे, महेश कांदेकर, लक्ष्मण कांदेकर, संदेश कांदेकर, मंगेश कांदेकर, सुभाष कांदेकर, गणेश ठीक, प्रकाश जाधव, बाबु धामणे, अभिषेक धामणे यांनी विशेष प्रयत्न केले. नंदिनी बुदर यांनी सर्व शिक्षकांचे करीत आलेल्या कार्याचे कौतुक केले. यापूर्वी जे घडल नाही ते आम्हाला पहावयास मिळत आहे याचे समाधान व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी व विद्याथ्यार्ंना स्पोर्टस कीट मिळावे म्हणून मुख्याध्यापक अमर चव्हाण, पदवीधर शिक्षिका सुरैय्या सय्यद, योगिता कुताळ, भाग्यश्री पालकर, पूनम कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमर चव्हाण व आभार प्रदर्शन योगिता कुताळ यांनी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg