loader
Breaking News
Breaking News
Foto

भरणेनाका परिसरातील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात; पुलाखाली असणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाई ---

खेड- शासनाने जाहीर केलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत येथील पोलिसांनी खेड शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा निर्णय घेतला असून सर्वप्रथम शहरातील पोलीस स्थानकाची रंगरंगोटी आणि सुशोभीकरण करण्यात आले. यानंतर खेड तालुक्याचे नाक म्हणून ओळखल्या जाणार्‍या भरणेनाका परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचा निर्धार केला असून खेड पोलिसांनी सुरुवात भरणे पुलाखालील अतिक्रमणे हटवून केली आहे. तसेच पुलाखाली असणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. दरम्यान भरणे पुलाखालील उभारण्यात आलेल्या अनधिकृत दुकानदारांना मंगळवारी १ एप्रिल रोजी सकाळी तोंडी समज देण्यात आली असून संध्याकाळपर्यंत हि दुकाने हटवा अन्यथा प्रशासनाकडून हटविण्यात येतील असा इशारा पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी दिला आहे. पुलाखाली असणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाई देखील केली असून यावेळी येथील रिक्षा थांबा हलवून पुलाच्या दुसर्‍या बाजूला उभारण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg