loader
Breaking News
Breaking News
Foto

शिमग्याच्या खेळाद्वारे जमलेल्या निधीतून गरजू कुटूंबांना केली मदत; तारकर्लीतील बाळगोपाळांचा आदर्शवत उपक्रम ---

मालवण(प्रतिनिधी)- तारकर्ली गावातील बाळगोपाळांनी शिमग्याच्या खेळातून जमलेल्या निधीद्वारे केली गरजू कुटुंबाना आर्थीक मदत करत समाजासमोर पुन्हा एकदा एक आदर्श प्रस्थापित केला आहे. सलग सातव्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. तारकर्ली गावातील रोहन नरेश कांदळगावकर, नैतिक धोंडी कांदळगावकर, आरव धोंडी कांदळगावकर, मृणाल लक्ष्मण सारंग, कुमार दत्तप्रसाद तेंडोलकर, सर्वेश राजेश नेवाळकर, निनाद गणपत मोंडकर, ईशांत सदाशिव सागवेकर, रिषभ श्रीधर खराडे, रोहित बाळकृष्ण वरक, दत्तराज शिवाजी पाटकर, हार्दिक सतिश टिकम, व वरुण तांडेल या बाळगोपाळांनी शिमगोत्सवा दरम्यान गावात शिमग्याचा खेळ सादर केला. त्यातून जमा झालेला निधी गावातील काही गरजू कुटुंबांना मदत म्हणून दिला. त्यामुळे या कुटुंबाचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका झाला आहे. यापुर्वी सुद्धा या बाळगोपाळांनी गावातील निराधार आणि गरजू व्यक्तींना या उपक्रमातून आर्थिक मदत केली होती. हे बाळगोपाळ गेली सात वर्षे सातत्याने अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित असल्याने सध्या तारकर्ली पंचक्रोशीसह सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg