loader
Breaking News
Breaking News
Foto

बलदंड प्रचितगडाचे कणखर अंग म्हणजेच बुरुज नवीन दृष्टिक्षेपात...!

संगमेश्वर/ सत्यवान विचारे. संगमरत्न फाउंडेशन (एनजीओ),गडकरी परिवार आयोजित शनिवार रविवार दिनांक २२,२३ मार्च २०२५ रोजी किल्ले संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर जवळील प्रचितगडावर ४० दुर्गप्रेमींसह श्रमदान मोहीम आणि दिशादर्शक फलक मोहीम आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रारंभ केलेली " प्रचितगड श्रमदान मोहीम " यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून किल्ल्यांच्या पायथ्यापासून ते शिखरापर्यंत विविध संरक्षण उपाययोजना राबवण्यात आल्या. या मोहिमेत इतिहास संशोधक, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य, आणि स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग महत्त्वपूर्ण ठरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सह्याद्रीच रौद्रभीषण रुप अनुभवायच असेल तर प्रचितगड किल्ल्यावर एकदा तरी जायलाच पाहिजे.सदर मोहिमेला जाताना शृंगारपूर गावातून किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेचा वापर केला होता.किल्ल्यावर जाताना लागणार घनदाट जंगल, ७० ते ८० अंशात चढणारी दमछाक करणारी घसरडी पाउलवाट , अडचणीच्या जागी लावलेल्या शिड्या किल्ल्याची दुर्गमता अधोरेखित करतात.सदर मोहिमेत मुख्य काम पूर्ण गेले ते म्हणजे पूर्णतः मातीखाली गेलेला सुरेख असा बुरुज, खिंडी मधून शिडी वापर करून गडाकडे येताना कातळात कोरलेल्या १० ते १२ पायऱ्या चढल्यानंतर दरवाजाचे अवशेष दिसतात.दरवाजाची कमान अस्तित्वात दिसत नसली तरी कमान ज्या खांबांवर उभी होती ते खांब आहेत.दरवाजा मधून आपण गडामध्ये प्रवेश घेतो तेच समोर असणारे पाण्याचे टाके.आणि तिथूनच डाव्या बाजूला असणारा भक्कम बुरुज,अक्षरशः बुरुज देखणा आणि सुरेख पण त्यावरील दगड,माती मुळे पूर्णतः भरुन गेला होता.जवळ जवळ ७ ते ८ फूट खोल, आणि त्यावरील वाढलेली झाडझुडपे मुळे बुरुज कोंडलेला वाटत होता.पण थोडा का होईना पण आता बुरुज नव्या रूपात येत आहे.हे पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता,अजून खूप काम तिथे बाकी आहे.या सोबतच गड मुख्य दरवाजा चढून वरती आल्यावर पाण्याचे टाके आहे.पण कित्येक वर्ष तसेच आहे.याच पाण्याच्या टाकी मधील अस्वच्छ पाण्याचा उपसा करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

श्री प्रचितगड श्रमदान मोहीम साठी स्थानिक विद्यमान आमदार श्री शेखर गोविंदराव निकम सर यांसकडून मोलाचे मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य करण्यात आले.तसेच सरांकडून मोहीम श्रमदाते यांना रात्रीचे जेवण देण्यात आले. शृंगारपूर गाव स्थानिक श्री.मनेश मस्के साहेब यांसकडून नाश्ता व्यवस्था करण्यात आली होती. डॉ.र.दि.गार्डी माध्यमिक विद्यालय, कळंबस्ते वाडावेसराड शाळेचे शिक्षकवर्ग श्री. जाधव सर,श्री.तांबे सर यांसकडून गडावर संवर्धन कार्यासाठी लागणाऱ्या वस्तू ५ टिकाव,५ फावडे, आणि १० घमेले देण्यात आली.श्री मुकुंद सनगरे यांसकडून उन्हापासून वाचण्यासाठी ग्रीन नेट देण्यात आले.सदर मोहिमेला प्रसिद्ध यूट्यूबर ' कोकणकर अविनाश ' श्री. अविनाश घडशी उपस्थित होते. मोहिमेच्या यशस्वीतेमुळे श्री प्रचितगड व इतर किल्ल्यांची संरचना टिकवून ठेवता येईल,आणि त्यांचा पर्यावरणीय व सांस्कृतिक वारसा जपला जाऊ शकतो. या यशासाठी सर्व सहभागी लोकांचे आम्ही धन्यवाद देत आहोत, ज्यांनी आपल्या अथक मेहनतीने या मोहिमेला यश प्राप्त करून दिले त्यांचे ' संगमरत्न फाऊंडेशन ' आणि ' गडकरी परिवार ' कडून आभार व्यक्त केले आहेत.रत्नागिरी जिल्हामध्ये तसेच शिवप्रेमींच्या कडून मोहिमेची चर्चा आणि मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल अभिमान व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

संगमरत्न फाउंडेशन आणि गडकरी परिवाराची यशस्वी श्रमदान,दिशादर्शक फलक मोहीम

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg