loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री ब्राह्मण देव सेवा समिती सुकळवाड अध्यक्षपदी बाबुराव मसुरकर तर सचिवपदी संतोष पाताडे ---

मालवण (प्रतिनिधी)- श्री ब्राह्मण देव सेवा समिती सुकळवाड अध्यक्षपदी बाबुराव मसुरकर तर सचिवपदी संतोष पाताडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. श्री ब्राह्मण देव सेवा समितीची पदाधिकारी निवडीबाबत सेवा समितीच्या कार्यकारिणीची सभा अध्यक्ष श्री अनिल पालकर यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या बैठकीत सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी बाबुराव मसुरकर यांची अध्यक्षपदी तर संतोष पाताडे यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. तसेच नूतन कार्यकारणीमध्ये उपाध्यक्षपदी प्रल्हाद वायंगणकर, खजिनदार- गणपत हिंदळेकर, सहसचिव नागेश पाताडे, कार्यकारिणी सदस्य म्हणून अनिल पालकर, किशोर पेडणेकर, विलास मसुरकर, रुपेश गरुड याची निवड करण्यात आली. यावेळी बोलताना सुकळवाड गावातील न्यासाच्या सर्व सभासदांना सोबत घेऊन सर्वाना अभिप्रेत असणारे आदर्शवत काम व ब्राह्मण देवाचे सर्व उत्सव दिमाखात पार पाडले जातील. अशी ग्वाही नूतन अध्यक्ष व सचिव यांनी दिलीे. सर्व स्तरातून नूतन कार्यकारणीचे अभिनंदन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg