loader
Breaking News
Breaking News
Foto

१०० हून अधिक लोकांची कोट्यवधींना फसवणूक; ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास सुरू ---

ठाणे(प्रतिनिधी)- ठाणे शहरातील बाजारपेठ परिसरात दोन कंपन्या थाटण्यात आल्या होत्या. २०१५ ते २०१९ या कालावधीत या कंपन्यांमध्ये ठेवींच्या बदल्यात चांगला परतावा मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. जादा परतावा आणि गुंतवणूकीच्या मोबदल्यात जमीनी मिळवून देतो असे आमिष दाखवून भामट्यांनी सुमारे १०० पेक्षा जादा लोकांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदर घटनेत काही गुतंवणूकदारांना त्यांच्या रकमेचा परतावा मिळत नव्हता. काही गुंतवणूकदारांनी कंपन्यांच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन याबाबत विचारणा केली. परंतु त्यांना आश्वासने दिली जात होती. काही दिवसांनी कंपन्यांचे अधिकारी कंपनीला टाळे ठोकून निघून गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोमवारी गुंतवणूकदारांनी याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे हे प्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान गुंतवणूकदारांना पाच वर्षामध्ये ६९ हजार रुपये भरल्यास एक लाख रुपयांचा मोबदला, तीन वर्षांमध्ये एकूण ३९ हजार ६०० रुपये भरल्यास ५० हजार रुपयांचा मोबदला अशा वेगवेगळ्या योजनाचे अमिष दाखविले होते. तर दुसर्‍या कंपनीच्या योजनेत एक लाख रुपये भरल्यास दरमहा दीड हजार रुपये आणि तीन वर्षानंतर मुद्दल पुन्हा मिळणार तसेच गुंतवणूकीच्या मोबदल्यात ६६६ चौ. फूट जागा, एकदाच पाच हजार रुपये भरल्यास सात वर्षांनी पाचपट म्हणजेच, २५ हजार रुपये आणि गुंतवणूकीच्या मोबदल्यास ३३ चौ. फूट जागा अशा विविध योजना गुंतवणूकदारांना देण्यात येत होत्या. ९६ गुतंवकणूकदारांनी या कंपन्यांत दीड कोटीहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली होती. या कंपन्यांनी गुंतवणूकदारांनाच एजंट केले होते. त्यामुळे अनेकांनी यात गुंतवणूक केली होती. फसवणूक झालेले गुंतवणूवणूकदार ठाणे जिल्ह्यातील आहेत. याप्रकरणाचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg