loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावरील पुई पेट्रोल पंपासमोर अपूर्ण रस्त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाश्यांच्या जिवाला धोका ---

संगलट(खेड)(प्रतिनिधी)- मुंबई-गोवा महामार्गावरील पुई पेट्रोल पंपा समोर गोवे गावाकडे जाणारा रस्त्याच्या मेन चौकात ठेकेदाराच्या मनमानी मुळे येथे येणारी जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक एकाच रस्त्यानी वळविण्यात आली आहे. मुंबई कडून कोलाड बाजूकडील जाणार्‍या वाहतूकीसाठी दिशादर्शक फलक लावण्यात आलेला आहे. परंतु कोलाड बाजूकडून मुंबई बाजुकडे जाणार्‍या रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आलेला नाही. या एकेरी रस्त्याने वाहन चालकांना अचानक दुसर्‍या बाजूला जावे लागत आहे. यामुळे या महामार्गावर अपघाताचा धोका वाढला असुन या मार्गावरून प्रवास करणार्‍या विद्यार्थ्यांसहित प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे एखादा मोठा अपघात झाला तर याला संबंधित ठेकेदार जबाबदार असेल अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई-गोवा महामार्गावरील पुई येथील महिसदरा नदीवरील नवीन पुलाचे काम सुरु असल्यामुळे या मार्गावरून येणारी जाणारी वाहतूक जुन्या रिपेयर केलेल्या पुलावरून वळविण्यात आली आहे. परंतु कोलाड बाजुकडून येणारी वाहतूक गोवे गावाकडे जाणार्‍या मेन चौकात आल्यानंतर येथे कोणताही दिशादर्शक फलक नसल्याने दुसर्‍या बाजूकडे जाण्यासाठी वाहन चालकांची तारंबळ उडत असुन या अपूर्ण रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. मुंबई गोवा महामार्ग ६६ वरील पुई पेट्रोल पंपा समोरून गोवे गावाकडे जाणारा रस्ता हा ठेकेदाराच्या मनमानी मुळे अर्धवट राहिलेला आहे. यासाठी गोवे ग्रामस्थ व आजूबाजूचे रहिवाशी यांनी गोवे गावाकडे जाणारा रस्त्याचे काम पहिले पूर्ण करण्यासाठी आंदोलन केले होते यावेळी होळी नंतर हे काम पूर्ण केले जाईल असे संबंधित ठेकेदार यांनी आश्वासन दिले होते. परंतु अद्याप हे काम पूर्ण झाले नाही. हे काम कोणत्याही ग्रामस्थांचा विचार न करता ठेकेदाराच्या मनमानी नुसार सुरु आहे. गोवे येथे गिता द. तटकरे पॉलिटेक्निकल कॉलेज असुन येथे असंख्य विद्यार्थी येत असतात तर गोवे गावातील धाटाव एमआयडीसीत कामावर जाणारे कामगार, कोलाड बाजारपेठेत जाणारे नागरिक व कोलाड हायस्कूल कडे जाणारे असंख्य विद्यार्थी याच मार्गानी ये जा करीत असतात परंतु यांना एका बाजूकडून दुसर्‍या बाजूकडे जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर कोलाड बाजुकडून येणारी वाहने सरळ दुसर्‍या बाजुकडे उभ्या असणार्‍या प्रवाश्यांच्या समोर येत आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला १८ वर्षे पूर्ण झाली. तरी या महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्‍न नागरिकांमधुन व्यक्त केला जात आहे. प्रवाश्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेली १८ वर्षा पासून या महामार्गावरील अपघातात अनेक प्रवाश्यांचा नाहक बळी गेला आहे व त्यांचे कुटुंब उध्वस्त झाले याला जबाबदार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg