मालवण(प्रतिनिधी)- मालवण मधील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाला ६० वर्षे पूर्ण होत असून याचा हिरकमहोत्सव दि. २६ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. यनिमित्ताने कॉलेजचे आजपर्यंतचे सर्व माजी विद्यार्थी एकत्र यावेत यासाठी स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कॉलेज जीवनातील आठवणीना उजाळा देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या हिरकमहोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मालवणच्या स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे मालवण येथील कान्हा रसोई हॉटेल मध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुधीर धुरी, नितीन वाळके, गौरव ओरसकर, महेश काळसेकर, दीपक कुडाळकर, प्रदीप नाईकसाटम, अभय कदम, हेमचंद्र कोयंडे, रुपेश खोबरेकर, प्रफुल्ल देसाई, शुभांगी सुकी, गौरी मयेकर, मनोज मयेकर आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी हिरकमहोत्सवी कार्यक्रमासाठी आवश्यक निधी संकलनासाठी क्यूआर कोडचे अनावरण करण्यात आले. यावेळी सुधीर धुरी यांनी हिरकमहोत्सव कार्यक्रमाबाबत माहिती दिली. हिरक महोत्सवासाठी १९६५ ते २०२४ पर्यंतच्या सर्व बॅचच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. व्हाट्सअप गुपद्वारे माजी विद्यार्थ्यांना जोडले जात आहे, तसेच गुगल फॉर्म द्वारे माजी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. निधी संकलनासाठी क्यूआर कोड आम्ही जाहीर करत असून प्रत्येकी १००० रु. रक्कम ठरविण्यात आली आहे. त्यापेक्षाही जास्त रक्कम स्वीकारली जाईल. माजी विद्यार्थ्यांनी महोत्सवासाठी सहकार्य करतानाच मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सुधीर धुरी यांनी केले. यावेळी गौरव ओरसकर यांनी कार्यक्रमांची रूपरेषा स्पष्ट केली. २६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत स. का. पाटील महाविद्यालयात संस्थेच्या वतीने होणार्या कार्यक्रमास सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे तसेच स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम दुपारी ३ ते रात्री उशिरापर्यंत मामा वरेरकर नाट्यगृह येथे होणार आहे. हा कार्यक्रम सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येण्यासाठी आम्ही माजी विद्यार्थी संघटना, नियोजन समिती यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी जो निधी गोळा करणार आहेत तो निधी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न राहील, तसेच त्यातील जास्तीत जास्त निधी कॉलेजच्या हितासाठी वापरण्यात येणार असल्याचे ओरसकर यांनी स्पष्ट केले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.