वैभववाडी (प्रतिनिधी)- लाकडी बांबूने वृद्धावर जीवघेणा हल्ला करीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेत पोबारा केला. पुरुषोत्तम नरहरी प्रभुलकर रा. नापणे धनगरवाडा असे या हल्ला झालेल्या वृद्धाचे नाव असून ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कणकवली येथे उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी नापणे धनगरवाडा येथे घडली. नापणे धनगरवाडा येथे रस्त्यालगत परशुराम प्रभुलकर यांचे घर आहे. शिमगोत्सवासाठी ते आपल्या मुलाबरोबर गावी आले होते. त्यांचा मुलगा सोमवारी रात्री मुंबईला गेला. त्यामुळे ते घरी एकटेच होते. मंगळवारी आपल्या अंगणात उभे होते. यावेळी या ठिकाणी एक अज्ञात इसम आला. त्याने बेसावध असलेल्या प्रभुलकर यांच्यावर बांबूने हल्ला करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेऊन तो पसार झाला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आजुबाजुच्या लोकांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे दाखल केले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना कणकवली येथे हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माधुरी आडुळकर, उद्धव साबळे, हरिश्चंद्र जायभाय, अभिजीत तावडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलीस अज्ञात हल्लेखोर चोरट्याचा शोध घेत आहेत.
टाइम्स स्पेशल
वरवेली शाळा नं.१ इमारतीच्या स्लॅबवर पत्राशेड मिळण्याबाबत आमदार भास्कर जाधव यांना वरवेली ग्रामस्थांचेे निवेदन
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.