नाग किंवा नागिन यांना माणसाला त्रास दिला तर ते बदला घेतात असे म्हंटले जाते. यावरुन अनेक चित्रपट देखील बनले आहेत. पण प्रत्यक्षात नाग नागिन नाही तर कावळा माणसांचा बदला घेतो. कावळा 17 वर्ष माणसांचा चेहरा लक्षात ठेवतो. एका संशोधनातून हा दावा करण्यात आला आहे. बदला पूर्ण होईपर्यंत कावळा त्रास देणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करत राहतो असा देखील दावा करण्यात आला आहे. कावळा हा जगातील सर्वात बुद्धिमान पक्षी मानला जातो. त्रास देणाऱ्या व्यक्तीचा कावळा सूड घेतो. एका अनोख्या संशोधनातून हे समोर आले आहे. कावळा तब्बल 17 वर्षांपर्यंत सूडाची भावना मनात ठेवतो. या संशोधनातून कावळच्या स्मरणशक्तीबाबतचे रोचक तथ्य देखील समोर आले आहे. कावळा समूहात राहणारा पक्षी आहे. त्याच्या सामहूहिक वर्तबाबत एक संशोधन करण्यात आले. यावरुन कावळ्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातील तज्ञांच्या टीमने कावळ्यांच्या वर्तनाबाबत संशोधन केले. 2006 मध्ये पर्यावरण शास्त्रज्ञ प्रोफेसर जॉन मार्झलफ यांच्या टीमने विशेष प्रयोग सुरु केला. या प्रयोगाअंतर्गत वेगळे दिसणारे 7 कावळे पकडण्यात आले होते. जॉन मार्झलफ यांच्या टीमने वेगळा चेहरा असलेले मुखवटे घालून हे कावळे पकडले होते. या कावळ्यांना सोडण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या पायात अंगठ्या लावण्यात आल्या जेणेकरून नंतर यांना ओळखता येईल. जेव्हा जॉन मार्झलफ यांच्या टीमचे सदस्य कावळे पकडताना घातलेले मुखवटे घालून विद्यापीठ परिसरात फिरायचे तेव्हा कावळ्यांचा थवा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करायचा. या थव्यात संशोधनासाठी पकडलेले सात कावळे देखील असायचे.
2013 मध्ये जेव्हा संशोधक मुखवटे घालून फिरले तेव्हा देखील कावळ्याने त्यांच्यांवर हल्ला केला. 2023 पर्यंत हा प्रयोग सुरु होता. विशेष म्हणजे फक्त ज्यांना त्रास दिले तेच कावळे नाही तर त्यांच्या समूहातील 40 ते 50 कावळे सातत्याने हल्ला करत होते. यानरुन तब्बल 17 वर्षांपर्यंत कावळे त्रास देणाऱ्या व्यक्तीचा चेहरा लक्षात ठेवत असल्याचे समोर आले.
टाइम्स स्पेशल
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.