क्रूजशिप... सहसा चित्रपटांमध्ये दिसणारं हे एखाद्या पंचतारांकित हॉटेलासमान भासणारं कमाल जहाज. जगाच्या पाठीवर विविध देशांमध्ये अशी अनेक आलिशान जहाजं असून, त्या माध्यमातून अनेक प्रवाशांना प्रवासाचा अविस्मरणीय सेवा विविध कंपन्यांमार्फत पुरवली जाते. अशाच एका जहाजाचा प्रवास सुरू असतानाच एक अनपेक्षित घटना घडली आणि या घटनेची जगभरात चर्चा झाली. इतकंच नव्हे, तर आरोग्य यंत्रणांच्या चिंतेत भरही पडली.
अमेरिकेतील Centers for Disease Control and Prevention (CDC) नं जारी केलेल्या माहितीनुसार एका आलिशान क्रूजवरील 200 हून अधिक प्रवासी आणि क्रू मेंबर एकाएकी आजारी पडल्यानं एकच खळबळ माजली. क्युनार्ड लायन्सच्या Queen Mary 2 या क्रूजवर हा प्रकार घडला असून, हे जहाज इंग्लंडहून पूर्व कॅरिबिअनच्या दिशेनं प्रवास करत असल्याचं वृत्त न्यूयॉर्क टाईम्सनं प्रसिद्ध केलं. नोरोव्हायरस (Norovirus) हा एक पोटाशी संबंधित विकार/ संसर्ग असून त्यामुळं अतिसार, मळमळ, उलट्या अशी लक्षणं बाधितांमध्ये आढळतात. हासुद्धा एक विषाणूजन्य आजार असून अतिशय वेगानं फैलावतो.
टाइम्स स्पेशल
जहाजावरील 224 प्रवासी आणि 17 क्रू मेंबरना अचानकच तिथं फोफावलेल्या विषाणूजन्य आजाराच्या संसर्गामुळं प्रकृती अस्वास्थ्याचा सामना करावा लागला. प्राथमिक माहितीनुसार या जहाजावर 2538 प्रवासी आणि 1232 क्रू मेंबर असून, त्यापैकी अनेकांमध्ये या रहस्यमयी व्हायरसच्या विळख्यात आल्यानं अतिसार आणि उलट्या, मळमळ अशी लक्षणं आढळून आली. प्राथमिक माहितीनुसार हा नोरोव्हायरसचा संसर्ग असल्याचं सांगण्यात आलं. हे क्रूज 18 मार्च रोजी न्यूयॉर्क इथं थांबलं असता हा संसर्ग फोफावल्याची माहिती क्रूज मॅपर या ट्रॅकिंग साईटनं जारी केली. सदर संसर्गाची माहिती मिळताच तातडीनं स्वच्छतेच्या निकषांच्या आधारे हे संपूर्ण क्रूज स्वच्छ करण्यात आलं आणि संसर्ग झालेल्या प्रवाशांना वैद्यकिय निरीक्षणाअंतर्गत ठेवण्यात आलं. यादरम्यान जहाजावर निर्जंतुकीकरणाची प्रक्रियासुद्धा युद्धपातळीवर राबवत अस्वस्थ प्रवाशांची चाचणीसुद्धा करण्यात आली. दरम्यान, जग एका विषाणूच्या विळख्यातून बाहेर पडत असतानाच नोरोव्हायरस आणि त्यासम संसर्गांना डोकं वर काढताना पाहून आरोग्य यंत्रणासुद्धा चिंतेत आली.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.