loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत पावसाचा शिडकाव, अनेकांची धावपळ

संगलट (इक्बाल जमादार) - दापोली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्ग धास्तावला आहे. पहाटेच्या सुमारास दापोलीत काही ठिकाणी पावसाचा शिडकाव झाला. ढगाळ वातावरण अजून काही दिवस राहण्याची शक्यता असून पावसाचा शिडकाव होण्याची शक्यतादेखील हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाडा व त्याच्या आसपासच्या भागात खालच्या टोपोस्फेरिक स्तरावर चक्रीय वार्‍यांची स्थिती आहे. चक्रीय वार्‍यांच्या स्थितीपासून उत्तर-दक्षिण दिशेने एक कमी दाबाचा पट्टा खालच्या टोपोस्फेरिक स्तरावर अंतर्गत कर्नाटक ओलांडून उत्तर तामिळनाडूपर्यंत जात आहे. या प्रणालींच्या प्रभावाखाली आणि अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून खालच्या स्तरावर येणार्‍या ओलसर वार्‍यांच्या संगमामुळे हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण व गोवा या भागांमध्ये पुढील दोन दिवस गडगडाट, वादळ, वीज आणि ताशी ३० ते ६० कि.मी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सकाळच्या सत्रात ९३ टक्के, तर दुपारच्या सत्रात ४८ टक्के सापेक्ष आर्द्रता दापोली येथील डॉ. कोकण कृषी विद्यापीठाने नोंदवली आहे. कमाल तापमान ३१.८ तर किमान तापमान १७.७ अंश सेल्सिअस आहे. गतवर्षी याच तारखेला कमाल तापमान ३४ तर किमान तापमान १७.७ अंश सेल्सिअस होते. मात्र सध्या वाढत्या सापेक्ष आर्द्रतेमुळे तगमग वाढली आहे. पाऊस पडण्याची परिस्थिती निर्माण झालेली असल्याने आंबा, काजू बागायतदार चिंता व्यक्त करत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg