loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजाच्या आठवडा बाजारच्या दिवशी संभाव्य अपघात टाळण्यासाठी अवजड वाहने इतरत्र मार्गाने वळविण्यात यावीत, जनतेतून मागणी

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामामुळे लांजा शहरातील रस्त्यांची खूपच दुरावस्था झाल्यामुळे वाहने चालविणे धोकादायक झाले असून पायी चालणे जिवावर बेतणारे आहे. त्यातच दुतर्फा गटाराचे बांधकाम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाल्याने मंगळवारच्या आठवडा बाजारात गर्दीतून दाटीवाटीने वाहने चालविणे भाग पडत आहेत. पक्का सर्व्हिस रस्ता नसल्याने अवजड वाहनांना लांजा आठवडा बाजार दिवशी तरी इतर मार्गाने वळविण्यात यावीत आणि संभाव्य धोका टाळावा अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा शहरात आजतागायत सर्व्हिस रस्ता करण्यात आलेला नाही. दुरावस्था झालेल्या रस्त्यावरून नाईलाजास्तव ये-जा करणे भाग पडत आहे. खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. एप्रिल महिन्यात सर्व्हिस रस्ता पूर्ण होईल असे महामार्ग अधिकारी यांनी पत्रकार यांना माहिती देताना सांगितले. मात्र पक्का सर्व्हिस रस्ता पूर्ण होण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. लांजा शहरातील पुलाचे काम सुरू आहे. तसेच गटाराचे बांधकाम सुरू आहे. चालू काम, रस्त्यांची झालेली दुरावस्था यातूनच कसरतीने वाहने हाकली जात असून पादचारी यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

टाइम्स स्पेशल

लांजाचा आठवडा बाजार मंगळवारी भरतो. तालुक्यातील नागरिक या आठवडा बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. आंबा, काजू सिझन असल्याने व्यापारी मोठ्या प्रमाणात येतात. बाजार दिवशी मोठी गर्दी असते. याच गर्दीने व्यापलेला रस्ता आणि अवजड वाहनांची असलेली वर्दळ यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रस्त्यावरून सतत असलेली वाहनांची वर्दळ असते मात्र अवजड वाहनांमुळे मोठा अडथळा निर्माण होत आहे. वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे पक्का सर्व्हिस रस्ता होईपर्यंत अवजड वाहने लांजा शहरातील मंगळवारी बाजारच्या दिवशी इतरत्र मार्गाने वळविण्यात यावीत, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg