loader
Breaking News
Breaking News
Foto

किरबेटच्या अश्विनी वैद्य ने तैवान मध्ये उभी केली गुढी

देवळे (प्रकाश चाळके )संगमेश्वर तालुक्यातील किरबेट (साखरपा) येथील अश्विनी यशवंत वैद्य हिने आपल्या भारतीय सहका-याना एकत्र घेऊन तैवानमध्ये गुढीपाडवा व हिंदू नवीन वर्ष सण साजरा केला.अश्विनीने स्वतः फुलांचा हार तयार करून इथल्या प्रमाणे गुढी सजवली व सहकरयाना घेऊन पूजा करुन गोड भोजनाचा आस्वाद घेतला. माझ्यासाठी गुढीपाडवा व हिंदू नवीन वर्ष तर उत्तर भारतीयांसाठी चैत्र नवरात्र व दक्षिण भारतीयांसाठी साथी उगड़ी सण होता. असे अश्विनीने बोलून दाखवले. यावेळी कोकणी, महाराष्ट्रीयन पद्धतीचे छोले भाजी,वरण भात; मिर्चीचा ठेचा, पापड़, भजी, गुलाबजाम अशा पद्धतीचे जेवण बनवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अश्विनी गेले एक वर्ष तैवान मध्ये टाटा कंसल्टेंसी सर्विसेस (TCS) मध्ये काम करते. तिच्यासोबत बेलिंडा बेंजामिन ( कर्नाटक)शिरीषा पज्जूरी ( कर्नाटक)यश जैन ( मध्यप्रदेश) देवेन्द्र राठौर ( राजस्थान)हे भारतीय सहकारी उपस्थित होते. आपली भारतीय संस्कृती जपणाऱ्या अश्विनी व तिच्या सहकाऱ्यांना तैवान नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.परदेशात असुनही मराठी संस्कृती ,परंपरा जपण्याचे प्रयत्न केल्याने सर्वत्र अश्विनीचे कौतुक होत आहे.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg