loader
Breaking News
Breaking News
Foto

ना. योगेशदादा कदम यांना ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित करणार – सदानंदराव भोसले

मुंबई : राज्याचे गृह राज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांना मराठा क्रांती स्वराज्य संघटनेतर्फे ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी मंत्रालयात त्यांच्या दालनात भेट घेऊन ही घोषणा केली. या भेटीदरम्यान खेड, दापोली, मंडणगड तालुक्यांतील विविध ग्रामीण समस्या आणि बिजघर येथील नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः बिजघर येथील साईबाबा मंदिर प्रवर्तक आणि दैनिक बेधडक महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक सदानंदराव भोसले यांनी गावाच्या विकासासाठी आवश्यक बाबींवर ना. कदम यांच्याशी चर्चा केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माजी मंत्री लोकनेते रामदासभाई कदम यांचा विकासात मोठा वाटा असुन गणेश विसर्जन घाटासाठी मंजूर निधी लवकर अंमलात आणण्याची मागणी नवीन नळपाणी योजना अद्याप सुरू नसल्याने महिलांची होणारी कुचंबणा दूर करावी. सदानंदराव भोसले म्हणाले, "ना. योगेशदादा कदम यांनी आपल्या मतदारसंघात विकासाच्या दिशा ठरवून मजबूत राजकीय आणि सामाजिक नेतृत्व उभे केले आहे. त्यांनी प्रशासनावर प्रभावी अंकुश ठेवत मराठा समाजाच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले आहे."

टाइम्स स्पेशल

९ मे रोजी मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या वतीने भव्य मेळाव्यात ना. योगेशदादा कदम यांना ‘समाज भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत मोरे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष कृष्णा शेलार यांनी दिली. या कार्यक्रमाला तालुक्यातील मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. लोकनेते रामदासभाई कदम यांच्या विचारधारेतून प्रेरणा घेऊन ना. योगेशदादा कदम यांनी सामाजिक एकता, बंधुता आणि सामंजस्य वाढवण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. ते श्रीमंत योगी स्वराज्य निर्मात्यांचा आदर्श ठेवून कार्यरत असून, मतदारसंघात अष्टपैलू नेतृत्व म्हणून नावारूपाला आले आहेत. हा सन्मान त्यांच्या कार्याची पोचपावतीच आहे, असे मत स्थानिक नागरिक आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg