माजी सभापती जया माने यांनी शिवसेना उबाठा पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधानसभा क्षेत्रप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर लांजा राजापूर साखरपा आमदार किरण(भैया)सामंत व माजी आमदार राजन साळवी यांच्या उपस्थित शिवसेना पक्षात प्रवेश केला.यावेळी त्यांच्यासमवेत साखरपा विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर व विकास कामाचा धडाका पाहून आपण शिवसेना मूळ प्रवाहात सामील होत असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांच्या समवेत देवडे सरपंच विलास कांगणे, किरबेट - भोवडे सरपंच प्रणिता कांबळे, उपसरपंच सतीश कांबळे, प्रशांत अडबल,कोंडगाव सरपंच प्रियांका जोयशी,भडकंबा माजी सरपंच शेखर आकटे, युवासेना तालुकाप्रमुख केतन दुधाने, सरपंच सिद्धी कटम, सुरेश कटम,उपतालुकाप्रमुख कमलेश मावळणकर,साखरपा सरपंच रुचिता जाधव,उपसरपंच शशांक लिंगायत,सुमित वाघधरे,विजय पाटोळे, राजा वाघधरे,साळसकर मॅडम,कुरुप मॅडम,धीरज लिंगायत, सचिन अंकुशराव, कुमार जाधव,दीपिका सुता, विलास साळस्कार, प्रकाश माने, राकेश चव्हाण, अनंत पांचाळ, प्रकाश कांबळे,सुरेश सुर्वे, रवी सावंत,तिवरे मेढे शाखाप्रमुख संतोष सुर्वे,किसन सुर्वे घाटीवळे मधील शाखाप्रमुख रवी कामेरकर,उपसरपंच लक्ष्मण शिंदे,सरपंच जाधव मॅडम यांच्या साखरपा विभागातील शेकडो शिवसैनिक जया माने यांच्यासोबत प्रवेश केला.
यावेळी जया माने यांच्या प्रवेशाचे स्वागत व शुभेच्छा आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य बापू शेट्ये यांनी दिल्या. त्याचबरोबर आमदार किरण सामंत यांनी मतदारसंघात कामाचा धडाका कायम ठेवणार असून पक्ष संघटना वाढीसाठी मेहनत घेण्याचे आव्हान केले. यावेळी व्यासपिठावर आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, उपजिल्हाप्रमुख राजेश पत्याणे,राजू कुरूप, जिल्हा बँकेचे श्री. खामकर,जगदीश राजपकर,महिला उपजिल्हाप्रमुख भाग्यश्री सुर्वे, संजय सुर्वे,बापू लोटनकर, बापू शिंदे, भाई बेर्डे,नेत्रा शिंदे,लक्ष्मण कदम राजेश कामेरकर, परशेट्ये मॅडम,प्रसाद अपंडकर, सुशांत सुर्वे,मनोहर सुकम, दत्ता घुमे, सुभाष सुर्वे काशिनाथ सकपाळ, शुभम गांधी,चंद्रकांत गोसावी, संजय पाष्टे, मनोहर गोवरे, दत्ता वाघधरे आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.