loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुका धनगर समाज अहिल्यादेवी होळकर समाज भवनाच्या प्रतिक्षेत

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुका धनगर समाज गेली कित्येक वर्षे अहिल्यादेवी होळकर समाज भवनाच्या प्रतिक्षेत आहे. भरणे गवळवाडी येथे असलेने समाज भवन ही काही खाजगी मालमत्ता असून धनगर समाज या ठिकाणी फिरकत नाही किंबहुना धनगर समाजासाठी येथे कुलूप लागलेले आहे. यासाठी माजी मंत्री रामदास भाई कदम यांनी समाजाच्या भल्यासाठी भरघोस निधी दिला होता. परंतु या वास्तूमध्ये खेड तालुका धनगर समाजाला प्रवेश नाकारला जातो ही फार मोठी शोकांतिका आहे. काही महिन्यापूर्वी समाजाचे उपाध्यक्ष श्याम गवळी यांनी खेड तहसिल कार्यालयासमोर अहिल्यादेवी होळकर समाज भवनासाठी आमरण उपोषण केले होते. याची दखल विद्यमान आमदार तसेच गृहराज्य मंत्री .ना.योगेशदादा कदम यांनी घेऊन समाजासाठी हक्काचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी भवनासाठी भरणे येथे जलसंपदा विभागाची जागा निश्चित केलेली आहे. सदर प्रस्ताव मंत्रालय स्तरावर रखडला आहे. तरी सदर प्रस्ताव तात्काळ मंजूर करून समाजाला न्याय मिळावा ही आग्रही मागणी खेड तालुका धनगर समजा मार्फत करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg