loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्मयोगी भाऊसाहेब रेवाळे हायस्कूल येथे स्वच्छता गृह आणि सुसज्ज प्रयोगशाळा यांचे उद्घाटन

खेड (वार्ताहर) : कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचलित कर्मयोगी भाऊसाहेब रेवाळे हायस्कूल मुरडे प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह व सुसज्ज प्रयोगशाळा याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्था अध्यक्ष भिकू गोवलकर, सचिव संस्था तु.ल. डफळे, सावली सेवा प्रतिष्ठान पुणेचे पदाधिकारी मंदार भाटवडेकर, सौ.मृणालिनी भाटवडेकर, घरडा फाउंडेशन सीएसआर फंड मॅनेजर श्री.पवार, घरडा फाउंडेशन युनियन अध्यक्ष घाग, दीपक चिनकटे, माजी सरपंच रविंद्र रेवाळे, प्रतिष्ठित नागरिक काणे, तू.बा.कदम, वरिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य साळुंखे, संस्था सदस्य स्वप्नील डफळे, प्रा.कांबळे, कर्मयोगी भाऊसाहेब रेवाळे, हायस्कूल मुरडेचे मुख्याध्यापक अरुण शिंदे, अमित कदम, श्री.रेवाळे, सौ. तांबट, श्री. शिगवण, श्री.बोडके, श्री.हिलम, पवार मॅडम, सर्व विद्यार्थी हजर होते. कर्मयोगी भाऊसाहेब रेवाळे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता गृह घरडा फाउंडेशन यांचे मार्फत देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सावली सेवा प्रतिष्ठान पुणे यांच्या मार्फत हायस्कूलला स्मार्ट टीव्ही, बायोमेट्रिक मशीन, सुसज्ज प्रयोगशाळा, यामध्ये विविध रसायने, विविध मॉडेल, भौतिक, रसायन आणि जीव शास्त्रातील विविध साहित्य, चार्ट, भूगोल विषयाचे साहित्य तसेच क्रीडा साहित्य प्रशालेस देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. शिंदे यांनी केले तसेच मंदार भाटवडेकर, श्री. घाग, डफळे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष गोवळकर यांनी मार्गदर्शन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg