स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने एका बँकरची माफी माहितली आहे. सोशल मीडिया मंच एक्स (आगोदरचे ट्विटर) वर लिहीलेल्या पोस्टमध्ये त्याने ही माफी मागितली आहे. इतकेच नव्हे तर त्याने या बँकरला एक खास ऑफरसुद्धा दिली आहे. कामरा याच्या मुंबई येथील कार्यक्रमास कथितरित्या हजर राहिल्यानंतर पोलिसांनी या बँकरला चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. स्टँड-अप कॉमेडियन सध्या वादाच्या भोवऱ्यास सापडला आहे. एका कार्यक्रमता सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यामध्ये त्याने कथीतरित्या विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवल्याचा आणि त्याचा उल्लेख गद्दार असा केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणात कामरा याच्यावर पोलिसांची करडी नजर असून, त्याला आतापर्यंत तीन समन्स पाठविण्याता आली आहेत. तसेच, त्याच्या सर्वात अलिकडील झालेल्या कार्यक्रमास उपस्थिती लावणाऱ्या प्रेक्षकांचीही चौकशी केली जात आहे.
सशल मीडियावरील माहती आणि प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सदर बँकर सुट्टी साजरी करण्यासाठी सध्या राज्याबाहेर गेला आहे. असे असताना त्याला मुंबई पोलिसांनी समन्स पाठविले ज्यामुळे त्यास आपला सुट्टी दौरा अर्धवट सोडून चौकशीसाठी परत यावे लागले. त्यामुळे स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने नवी मुंबईतील एका बँकरची माफी मागितली आहे. शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करणाऱ्या विनोदांबद्दल कामरावर दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात बँकरला साक्षीदार म्हणून बोलावण्यात आले होते.
टाइम्स स्पेशल
कुणाल कामरा याने सदर बँकरवर उद्भवलेल्या परिस्थितीवर खेद व्यक्त केला आणि त्यास भारतातील कोणत्याही ठिकाणी बँकरसाठी सुट्टी प्रायोजित करण्याची ऑफर दिली. 'माझ्या शोमध्ये सहभागी झाल्यामुळे तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल मी मनापासून दिलगीर आहे. कृपया मला ईमेल करा, जेणेकरून मी तुमची पुढची सुट्टी भारतात कुठेही शेड्यूल करू शकेन," असे कामरा यांने X वर पोस्ट केले
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.