वेळणेश्वर (उमेश शिंदे) : गुहागर तालुक्यातील विविध समुद्रकिनारांबरोबर शहराला लाभलेल्या सहा किलोमीटरच्या विस्तीर्ण, स्वच्छ, सुंदर अशा समुद्रकिनार्यावर आत्ता सी प्रहरी इलेक्ट्रिक सायकलची गस्त सुरू राहणार आहे. यामुळे गुहागरच्या पर्यटनाला गुहागर पोलिसांचे सुरक्षा कवच प्राप्त झाले आहे. गुहागर समुद्रकिनार्यावर नगरपंचायतीच्यावतीने सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. त्याचबरोबर बंदर विभागाच्यावतीने दोन सुरक्षारक्षक आहेत. या सुरक्षारक्षकांबरोबर गुहागर पोलिसांचेही समुद्रकिनारी फेरफटका मारून सुरक्षेविषयी सर्वाधिक लक्ष आहे. शहराला तब्बल सहा किलोमीटरचा विस्तीर्ण स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. या किनार्यावर अधिक सक्षमतेने लक्ष ठेवण्यासाठी तसेच समुद्रकिनारी येणार्या पर्यटकांना सुरक्षा देण्याचे कामही सुरक्षारक्षक व पोलीस यंत्रणा करत आहे. मात्र गुहागर पोलीस ठाण्याकरता आलेले सी प्रहरी इलेक्ट्रिक सायकलिंगमुळे समुद्रकिनार्याची सुरक्षा अधिक भक्कम झाली आहे.
मुख्यमंत्री यांच्या सात कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून शहराच्या समुद्रकिनारी गस्ती करता दोन इलेक्ट्रिक सायकल गुहागर पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या आहेत. या सायकल समुद्राच्या वाळू मधून सहज फिरू शकतात यामुळे पोलिसांची समुद्रकिनार्यावरील गस्त अधिक व्यापक बनली आहे. कोणतीही अघटीत घटना घडल्यास तातडीने सहा किलोमीटरच्या या समुद्रकिनार्यावर पोलीस सहज पोहोचू शकतात.
गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी समुद्रकिनार्यावरील सुरक्षेसाठी या इलेक्ट्रिक सायकलची गस्त सुरू ठेवली आहे. महिला पोलीस कर्मचारी मार्फत कायम समुद्रकिनारी गस्त सुरू आहे. दररोज सुरू असलेल्या या गस्तीबाबत रत्नागिरी कार्यालयामध्ये याची नोंद होते. गुहागर समुद्रकिनारी येणारा पर्यटक हा सहा किलोमीटरच्या या विस्तीर्ण अशा चौपाटीवर फिरत असतो. या किनार्यावर पर्यटक बिनधास्त फिरू शकतो कारण या सी प्रहरी इलेक्ट्रिक सायकलची गस्त आता कायम सुरू राहणार आहे. यामुळे पर्यटन अधिक सुरक्षित बनले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.