loader
Breaking News
Breaking News
Foto

शृंगारतळी बाजारपेठ येथील पूल मार्केट येथील "तो" खड्डा अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी बुजवला.

वरवेली गणेश किर्वे गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ येथील पूल मार्केट येथील राष्ट्रीय महामार्गावरील अपघातास कारणीभूत ठरत असलेला "तो" खड्डा अखेर जानवळे येथील विनोद जानवळकर व पिंट्या शेट संसारे यांनी सदरचा खड्डा बुजवला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराकडून या खड्ड्याकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने अनेक वेळा या ठिकाणी छोटे छोटे अपघात होत होते तसेच या ठिकाणाहून वाहनेही भरधाव वेगाने जात असल्याने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सदरचा अपघातग्रस्त खड्डा बुजविल्याने येथील नागरिक व वाहन चालक त्याचप्रमाणे नागरिकांनी या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच शृंगारतळी बाजारपेठ येथील पूल मार्केट येथील रस्त्याचे काम सध्या होत नसेल तर संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे तात्पुरते तरी डांबरीकरण करावे अशी मागणी केली आहे. ठेकेदाराने या रस्त्याचे काम घेतले असल्याने या रस्त्याची दुरुस्ती ही या ठेकेदारानेच करणे गरजेचे आहे परंतु संबंधित ठेकेदाराकडून हे घडत नसल्याच्या तक्रारी सुद्धा या ठिकाणी वाढू लागले आहेत. त्याचप्रमाणे शासकीय विश्रामगृह गुहागर ते गुहागर शहर या अंदाजे दोन किलोमीटर अंतराचे रस्त्याच्या रुंदीकरणचे काम अद्यापि झालेले नाही, सदरचा रस्ता हा वाहतुकीस योग्य नाही, या ठिकाणी अनेक दुचाकी स्वार घसरून छोटे छोटे अपघात या ठिकाणी सतत होत आहेत. तरी या रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपात त्वरित डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg