loader
Breaking News
Breaking News
Foto

बँक व्यवहार करते वेळी मराठी भाषेचा वापर करा , कॅनरा बँक शृंगारतळीला मनसे इशारा

वरवेली गणेश किर्वे बँक व्यवहार करते वेळी मराठी भाषेचा वापर करण्याबाबत कॅनरा बँक शृंगारतळीचे व्यवस्थापक यांना मनसे गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर यांनी पत्र दिले आहे. दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. शृंगारतळी येथील कॅनरा बँकेची शाखा असून सदरची शाखा ही मराठी बोलीभाषा असलेल्या तालुक्यात आहे. शृंगारतळी परिसरातील ग्रामीण भागातील अनेक नागरिक आपल्या बँकेचे खातेदार आहेत.काही स्थानिक लोकांना आपल्या बँकेमध्ये मराठी मध्ये व्यवहार करण्यासाठी अडचण येत आहे, बँकेत येणारे ग्राहक तसेच बचत गटातील महिला यांच्याशी हिंदी भाषेतून बोलण्यात येत आहे. सदरची हिंदी भाषा ग्रामीण भागातील महिलांना समजून येत नाही. त्यामुळे बँकेचा कर्मचारी काय बोलला हे त्या महिलांना तसेच इतर ग्राहकांना समजत नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपणास विनंती अथवा सूचित करण्यात येते कि, आपण आपल्या बँकेमध्ये मराठी भाषिक कर्मचारी ठेवून येणाऱ्या स्थानिक ग्राहकांना समजेल अशा भाषेत व्यवहार करावा. जरी बँकेतील वरिष्ठ यांना अडचण असेल तर मराठी भाषिक कर्मचाऱ्या कडून त्यांना योग्य ती मदत करून द्यावी. जर कोणत्याही स्थानिक भाषिक (मराठी) व्यक्तीकडे (मराठी भाषेमुळे) दुर्लक्ष केले गेले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कारवाई करेल असा इशाराही गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी शेवटी दिला आहे.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg