loader
Breaking News
Breaking News
Foto

कोल्हापूर ते पणजी बसचे कोदाळी माऊली मंदीर येथे जंगी स्वागत

दोडामार्ग (प्रतिनिधी) : गोवा ते दोडामार्ग तिलारी घाटातून कोल्हापूर, बेळगाव असा जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटातून गेले नऊ महिने एस टी बसेस बंद होत्या. या बसेस सुरू झाल्या पाहिजे यासाठी सरपंच सेवा संघटना सिंधुदुर्ग जिल्हा संघटना यांच्या माध्यमातून आवाज उठवला होता. आंदोलन, उपोषण देखील केले होते. पण चंदगड बांधकाम विभाग यांच्या आडमुठ्या धोरणामुळे बसेस सुरु होणे रखडले होते. अखेर बांधकाम विभाग कडून आवश्यक उपाययोजना पूर्ण करून घेऊन अखेर बसेस सुरू करण्यासाठी आवश्यक पञ द्यायला लावले आणि कोल्हापूर एस टी विभाग नियंत्रण यांनी बसेस सुरू करायला परवानगी दिली आणि पहिली बस कोल्हापूर पणजी सोडण्यात आली. या बसचे कोदाळी माऊली मंदीर या ठिकाणी दोडामार्ग चंदगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ यांच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले. तर चालक वाहक यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, प्रवासी, शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते. बस सेवा सुरु झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बुधवारी कोल्हापूर पणजी पहिली बस साडेअकरा वाजता कोदाळी येथे दाखल झाली. यावेळी माऊली मंदीर येथे दोडामार्ग, चंदगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, आंदोलनकर्ते यांनी स्वागत केले. कोदाळी माऊली मंदीर मानकरी, ग्रामस्थ, सरपंच, महिला यांनी एस टी बसचे हळदकुंकू लावून पूजन केले. पंचारती ओवाळली. यानंतर कोल्हापूर पणजी बसचे चालक संताजी देसाई, वाहक संतोष गभाले यांना फेटे बांधून त्यांचा मान्यवर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. टाळ्यांचा गजरात बसचे कोदाळी माऊली मंदीर येथे जंगी स्वागत करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

गेल्या नऊ महिन्यापासून तिलारी घाटातून एस टी बस सेवा बंद झाली होती. अनेकांना बस कधी सुरू होतात याकडे लक्ष लागून होते. पण काही राजकीय पदाधिकारी आग्रही दिसत नव्हते त्यामुळे सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस यांनी विषय उचलून धरला होता आणि अखेर या लढ्याला यश आले. नऊ महिन्यांच्या कालावधी नंतर बसेस सुरू झाल्या यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. कोदाळी माऊली मंदीर येथे एसटी बस स्वागतावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, सामाजिक कार्यकर्ते अंकुश गावडे, लक्ष्मण गावडे, अंकुश गवस, दत्ताराम देसाई, राजन गावडे, अमित देसाई, सचिन देसाई, भाऊसाहेब देसाई, लिंगाजी गवस, सुप्रिया गवस, प्रभावती केसरकर, सोमा दळवी, शुभम गवस, लक्ष्मण नाईक, अब्दुल नाईकवाडी, शेखर बेळेकर, चंदगड दोडामार्ग तालुक्यातील ग्रामस्थ, युवक उपस्थित होते. तिलारी घाटातून इतर बसेस देखील पूर्ववत सुरू झाल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg