loader
Breaking News
Breaking News
Foto

जागतिक स्वमग्नता जागरुकता दिनानिमित्त "आस्था" कडून जनजागृती

रत्नागिरी (जमीर खलफे) - 2 एप्रिल जागतिक स्वमग्नता जागरूकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाच्या निमित्ताने आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या संस्थेकडून स्वमग्नता अर्थात ऑटीझम म्हणजे काय आहे? हे सोप्या शब्दात व चित्रांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना कळेल या साठी पोस्टर तयार करण्यात आले होते.आज या जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चे श्री.विनोद वायंगणकर यांच्या हस्ते करण्यात आले. आस्थाच्या सुरेखा पाथरे यांनी ऑटिझमच्या लक्षणांची माहिती दिली. तसेच पालकांनी आपल्या मुलांमधील या लक्षणांकडे लवकरात लवकर पालक म्हणून लक्ष दिल्यास व शक्य तितक्या लवकर थेरपी उपचार सुरु केल्यास मुलांना वयानुरूप वाढ आणि विकासाचे टप्पे गाठता येतात. त्यामुळे मुल खुप चंचल असेल, वयानुरूप बोलत नसेल,स्वतःमध्येच मग्न राहत असेल, इतर मुलांमध्ये मिसळत नसेल तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. अशा बालकांसाठी आस्था मध्ये सर्व प्रकारचे सल्ला समुपदेशन व थेरपी उपचार उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये डीईआईसी येथे देखील मुलांसाठी सेवा उपलब्ध आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विनोद वायंगणकर यांनी या स्तुत्य उपक्रमाची गरज आहे व सर्वांनी माहिती घेऊन समाज प्रबोधन करावे असे मत व्यक्त केले. आस्था च्या कार्यकर्त्यांनी ऑटीझम चे माहितीपत्रक परिसरात माहिती देत वितरित केले व ऑटिझम असलेल्या मुलांना आपण स्वीकार करून समजून घेऊन, आधार व प्रेम देण्याची,सामावून घेण्याची आवश्यकता व्यक्त केली. या उपक्रमात संस्थेचे कार्यकर्ते, पालक व मुले सहभागी झाले होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg