loader
Breaking News
Breaking News
Foto

माईण येथे आगीत घर भस्मसात

कणकवली (प्रतिनिधी) - शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत संपूर्ण भस्मसात होण्याची घटना कणकवली तालुक्यातील माईण येथे घडली आहे. या आगीत अनिल दिनकर सुखटणकर यांचे घर आगीत संपूर्ण भस्मसात झाल्याने 61 लाखांचे नुकसान झाले आहे. सदर घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास माईण येथे घडली. दरम्यान घटनास्थळी गावातील सर्व नागरिकांनी धाव घेतली तसेच कणकवली पोलीस व अग्निशमन बंब ही दाखला झाला होता मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान जळत असलेल्या घरात दोन सिलेंडर होते. एक सिलेंडर बाहेर काढण्यात यश आले तर दुसऱ्या सिलेंडरचा मोठा स्फोट झाला सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. मात्र लाखोंचे नुकसान झाले आहे. गतवर्षी सागवानी असलेल्या घराला लाखोंचा खर्च केला होता. घराला आग लागली तेव्हा अनिल दिनकर सुखटणकर यांची पत्नी आणि मुलगा घरात होता . मात्र आग लागताच त्यांनी घरातून बाहेर येणे पसंत केले. महसूल विभागाने या नुकसानीचा पंचनामा केला असून 61 लाखांचे नुकसान झाले आहे. मंडळ अधिकारी आत्मबोध जाधव, तलाठी सुदर्शन अलकुटे, पोलिस पाटील नारायण गावकर यांच्यासह भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संदीप सावंत, राजू हिर्लेकर, सरपंच नितिशा पाडावे यांनी भेट देऊन पाहणी केली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg