loader
Breaking News
Breaking News
Foto

ब्रेक फेल झाल्यानं शिवशाहीला अपघात; चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचले

संगलट (खेड)( इक्बाल जमादार) - दापोली-पुणे शिवशाही बसचा रेवतळे आंग्रे कोंड जवळ वळणावर ब्रेक फेल झाल्याने झालेल्या अपघातात शिवशाही मधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना रेवतळे फाट्यावरील खाजगी डॉक्टर कडे वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले आहे. दापोली येथून दुपारी दोन वाजता सुटणारी MH ०६ /B W ०६३४ दापोली पुणे ही बस महाड तालुक्यातील रेवतळे आंग्रे कोंड येथे वळणावर आली. असता चालक साबळे याने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला असता ब्रेक लागत नसल्याने त्याने प्रसंगावधान राखून रस्त्या जवळील गटारात गाडी उतरवण्याचा प्रयत्न केल्याने बसमधील २२ प्रवाशांचे प्राण वाचले. मात्र रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या अशोक भास्कर यांच्या संरक्षण भिंतीला जाऊन बस धडकल्याने पुढील अनर्थ टळला या बसमधून पुण्यासाठी प्रवास करणारे तीन प्रवासी जखमी झाले त्यांची नावे पुढील प्रमाणे महेंद्र चौरसिया, सुरज जाधव, विकास राठोड. अशी असून त्यांना रायगड क्लिनिक या खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्या ठिकाणी त्यांच्यावर वैद्यकीय उपचार चालू आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबतची माहिती महाड एसटी आगाराला प्राप्त होताच एसटीचे पथक व रुग्णवाहिका तातडीने या ठिकाणी व गाडीतील अन्य प्रवाशांना नेण्यासाठी महाड आगारातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg